Bidhar ( बिढार )
Bidhar ( बिढार )
Share
Author:
Publisher:
Pages: 182
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
Bidhar ( बिढार )
Author : Bhalchandra Nemade
जीवनाचा एवढा विस्तृत पट चित्रित करणारे व सामाजिक स्वरूपाच्या आशयद्रव्याने संपृक्त असणारे नेमाडे यांचे हे कादंबरीचतुष्टय वाचल्यावर कोणी असा मात्र गैरसमज करून घेऊ नये की नेमाडे हे केवळ सामाजिक चित्रणालाच महत्त्व देणारे कादंबरीकार आहेत. अनेकांचा ह्या प्रकारचा गैरसमज दिसून येतो, म्हणून ही जाणीव करून देणे आवश्यक वाटते. वस्तुतः नेमाडे हे कादंबरीच्या आशयद्रव्याला जसे महत्त्व देतात त्याचप्रमाणे कादंबरीच्या सौंदर्यात्मक रूपनिर्मितीलाही देतात...आधुनिक जाणिवांचे आविष्कार करण्यासाठी आपल्या परंपरेचा शोध घेऊन त्यामधील कल्पनांचा रूपनिर्मितीसाठी उपयोग करणे हे नेमाडे यांच्यामधील जागरूक कलावंताचे उदाहरण म्हणता येईल. ह्या कादंबरीमध्ये नेमाड्यांनी उपयोगात आणलेल्या विविध बोली पाहून वाचक स्तिमित झाल्यावाचून राहत नाही. मराठीत तरी अन्य कुणा एका कादंबरीकाराने एवढ्या विविध बोलींचा संवादासाठी उपयोग करण्याची क्षमता दाखवलेली आढळत नाही. नेमाडे यांनी कादंबरीत निवेदनासाठी वापरलेली भाषा हीही अत्यंत सहेतुकपणेच वापरल्याचे शब्दाशब्दावरून जाणवते. एकंदरीत नेमाडे हे कादंबरीच्या आशयद्रव्याच्या बाबतीत जसे जागरूक आहेत, तसेच त्याच्या विविध स्वरूपी आविष्काराच्याबाबत तो नवनिर्मितीच्या पातळीवरही कसा जाईल, याबाबतही दक्ष आहेत.
It Is published By : Popular Prakashan Pvt Ltd