Akshardhara Book Gallery
Bilamat (बिलामत)
Bilamat (बिलामत)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dinkar Dabhade
Publisher: Varnamudra Publishers
Pages: 284
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
बिलामत
चवदा वरसं जंगलानं फरार राह्यलो. कितीक खेप पोलिसाईनं हमले केले. एका हमल्यात बंदुकीच्या सहा गोया लागल्या. दोन जेवण्यापायाच्या मांडीतून आरपार निंगून गेल्या; दोन जेवण्याहाताच्या पंज्याले लागल्या! बोटाईचे सालर्ट सालटं उळले. त्या हातानं अजून काहीच करता येत नाही. पाठीतल्या गोया तं शेवटालोक काळता आल्या नाहीत. त्या तठीच घर करून राह्यल्या. त्येच्यातून वाचलो... अर आज एकोणीस वरसं जेलची सजा काटून लोकाईम्होरं बोलून राह्यलो... यवतमाळ-नांदेडच्या परिसरात एकेकाळी श्यामादादा कोलाम म्हणजे 'टेरर' होते. अपघातानं ते दरोडेखोर बनले. त्यांनी सावकारांना लुटलं आणि गरिबांना मदत केली. रझाकारांविरुद्धच्या लढ्यात ते उतरले आणि 'नाना पत्री'शी त्यांचा पत्रव्यवहार होता. खास वऱ्हाडी बोलीतील त्यांची ही चरित्रकथा.
लेखक. दिनकर दाभाडे
प्रकाशक वर्णमुद्रा पब्लिशर्स
