Akshardhara Book Gallery
Bose : Eka Aswasth Karnarya Rashtravadichi N Sangitleli Katha (बोस : एका अस्वस्थ करणाऱ्या राष्ट्रवादीची न सांगितलेली कथा)
Bose : Eka Aswasth Karnarya Rashtravadichi N Sangitleli Katha (बोस : एका अस्वस्थ करणाऱ्या राष्ट्रवादीची न सांगितलेली कथा)
Couldn't load pickup availability
Author: Chandrachud Ghosh
Share
Publisher: Hedwig Media House
Pages: 768
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Dr. Shuchita Nandapurkar - Phadke / Jyoti Aafle
बोस : एका अस्वस्थ करणाऱ्या राष्ट्रवादीची न सांगितलेली कथा
नेताजी, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाची व्यक्ती, जिच्याविषयीची अनेक तथ्ये आजही सांगितली गेलेली नाहीत. अशा अज्ञात तथ्यांवर प्रकाश टाकण्याचं काम या चरित्रातून केलं गेलं आहे. लाहोर काँग्रेस इथे १९२९ मध्ये 'संपूर्ण स्वराज्य' घोषित करण्याच्या सुभाषबाबूंच्या ठरावाला गांधींनी विरोध केला. ब्रिटिशांनी सहा महिन्यांत भारत सोडून जावे, असा निर्वाणीचा इशारा देण्याच्या सुभाषबाबूंच्या सन १९३९ मधील प्रस्तावालाही गांधींनी विरोध केला. पण १९४२च्या 'भारत सोडा' या चळवळीत मात्र गांधींनी तत्सम प्रणालीच राबवली. सुभाष यांनी जिनांना स्वतंत्र भारताचे पंतप्रधानपद देऊ केले होते, नंतर मात्र 'मुस्लीम लीग' हे ब्रिटिश धार्जिणी असून केवळ 'होय वा' करणाऱ्यांचा आणि विश्वासघातक्यांचा त्यात भरणा आहे, असे त्यांनी म्हटले. गांधी, नेहरू किंवा इतर कुणापेक्षाही सुभाष कदाचित अधिक चांगले ठरले असते, असेच म्हणता येईल. त्या सवएिवजी आपण सुभाषना नेतृत्व देऊ शकलो असतो, तर माझ्या मते, आपण भारतचे भलेच करू. (रिचर्ड तोत्तेनहम, होम मेम्बर फ्रान्सिस मुडी यांचे अतिरिक्त सचिव, १७ सप्टेंबर १९४५) सुभाष यांचा खात्मा करावा अशी विन्स्टन चर्चिल यांच्या 'स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह'ची इच्छा असली, तरी भारताचे व्हायसरॉय लॉर्ड वोवेल यांना मात्र सुभाष यांना भारतातून 'बाहेर काढायचे' होते. आणि युद्धाच्या शेवटी त्यांना फासावर लटकवता येण्याची कितपत शक्यता आहे, हे होम मेम्बर फ्रान्सिस मुडी पडताळून पाहत होते.
मूळ लेखक. चंद्रचूड घोष
अनुवादित लेखक. डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके / ज्योती आफळे
प्रकाशक. हेडविग मीडिया हाउस
