Akshardhara Book Gallery
Brave New Words (ब्रेव्ह न्यू वर्ड्स)
Brave New Words (ब्रेव्ह न्यू वर्ड्स)
Couldn't load pickup availability
Author: Salman Khan
Share
Publisher: MyMirror Publishing House
Pages: 272
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
ब्रेव्ह न्यू वर्ड्स
एआयचं नवीन युग: शिक्षण क्षेत्रातील क्रांती
आपल्याला आवडो वा न आवडो, शिक्षण क्षेत्रात एआयची क्रांती दार ठोठावत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि GPT तंत्रज्ञानामुळे शिकण्याची प्रक्रिया बदलणार आहे. ती कशी, हे या पुस्तकात खान अॅकॅडमीचे संस्थापक सलमान खान सांगतात. एआयच्या या रोमांचक नव्या जगात पुढे जाण्यासाठी हे पुस्तक शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
शिक्षण क्षेत्रातील अग्रणी या नात्याने लेखक सलमान खान या अत्याधुनिक साधनांतील सूक्ष्म गोष्टी समजावून सांगतात. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात शिकण्याची व शिकवण्याची पद्धत कायमची कशी बदलणार आहे, हेही सांगतात. या ChatGPT क्रांतीकडे भीतीने पाहण्याऐवजी, पालक आणि शिक्षकांनी एआयला स्वीकारावे आणि त्याच्याशी जुळवून घ्यावे असे ते सुचवतात. खान सर यावर भर देतात की, शिक्षणात एआयचा वापर मानवी संवाद संपवण्यासाठी नव्हे, तर तो अधिक समृद्ध करण्यासाठी आहे. यामुळे पुढील गोष्टी घडतीलः
प्रत्येक विद्यार्थी आपल्या सध्याच्या कामाला पूर्णपणे नवीन आणि सर्जनशील पद्धतींनी पूर्ण करू शकेल. शिकण्याची प्रक्रिया अधिक वैयक्तिक (Personalized) करता येईल. विद्यार्थ्यांचं मूल्यांकन अधिक अचूकपणे करता येईल. झपाट्याने डिजिटल होत असलेल्या भविष्याकरिता विद्यार्थ्यांना तयार करता येईल.
लेखक : सलमान खान
प्रकाशन : मायमिररर प्रकाशन
