Akshardhara Book Gallery
Cafe Oceana (कॅफे ओशियाना)
Cafe Oceana (कॅफे ओशियाना)
Couldn't load pickup availability
Author: Vikram Bhagwat
Share
Publisher: Mihana Publications
Pages: 112
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कॅफे ओशियाना
एक इराणी कॅफे ! तिथली ज्यूकबॉक्स आणि तिथे भेटलेले 'तो' आणि 'ती' यांचा एकमेकांपर्यंतचा प्रवास म्हणजे कादंबरी 'कॅफे ओशियाना'. ओशियाना असा शब्द अस्तित्वात नाही, तरीही तोच शब्द बोर्डवर हवा असा अट्टाहास असलेली खुर्शीद ही त्या दोघांमधील एक महत्त्वाची मध्यस्थ. एक क्लासिक जुनी ज्यूकबॉक्स होती. संध्याकाळी ती रंगीबेरंगी प्रकाशात न्हाऊन निघायची. तिचे तसे दिसणे हेच खूप रोमँटिक होते. म्हणजे वयातली पन्नास वर्षे वजा करून नायक पुन्हा वीस वर्षांचा होऊ शकायचा. शिवाय संध्याकाळचे दोन तास, जे एरवी जीवघेणे असू शकतात, ते तो इथे बसून गाणी ऐकत, इराणी चहा पीत घालवू शकायचा. इथून दिसणारा सूर्यास्त उदास करायचा नाही आणि त्याला खुर्शिद आवडायची! तिचा उत्साह, तिची ऊर्जा, पुरुषांच्या राज्यात स्वतःची जागा बनवायची तिची धमक, म्हणजे 'कॅफे ओशियाना'! 'ती'ची एक बंडखोर व्यक्तिरेखा 'त्या'ला या कॅफे ओशियानात भेटते आणि दोघेही पुन्हा एकदा नव्याने हरवलेले जगणे शोधण्याचा प्रयत्न करू लागतात. ज्यूकबॉक्समध्ये वाजणाऱ्या गाण्यांतून पात्रांचे मनोविश्व उलगडत जाते. त्या सुप्रसिद्ध हिन्दी आणि इंग्रजी गाण्यांतून जणू ते आपल्याशी बोलत आहेत. ही गाणीच वाचक आणि पात्रं यांच्यातील पूल बनतात आणि कथानकाला अधिक संवेदनशील बनवतात. गाण्यांच्या, सुरांच्या जगातला हा प्रवास वाचकाला एका वेगळ्या जगात घेऊन जातो. हा प्रवास म्हणजे 'कॅफे ओशियाना'.
लेखक. विक्रम भागवत
प्रकाशक. मिहाना पब्लिकेशन .
