Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Camerya Magchi 'Ti' (कॅमेऱ्या मागची 'ती')

Camerya Magchi 'Ti' (कॅमेऱ्या मागची 'ती')

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr Pravin Ghodeswar

Publisher: Bhagyashree Prakashan

Pages: 128

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

कॅमेऱ्या मागची 'ती'

भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची दारे उघडली आणि आज त्यांच्याच लेकी आकाश कवेत घेत निरनिराळ्या क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवत आहेत. महिलांच्या या प्रगतीचे दर्शन घडवणारे प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांचे हे एक विशेष पुस्तक! काय आहे या पुस्तकात ? दिग्गज वारसाः भारतातल्या पहिल्या महिला व्यावसायिक छायाचित्रकार होमी व्यारावाला यांच्या जिद्दीचा इतिहास, ज्यांनी पुरुषप्रधान क्षेत्रात स्वतःची ओळख प्रस्थापित केली. याखेरीज त्यांच्या समकालीन अन्नपूर्णा दत्त यांचाही समावेश या पुस्तकात केलेला आहे. नवा संघर्षः काश्मीरमधल्या पहिल्या महिला वेडिंग फोटोग्राफर साहिबा वानी यांच्यासारख्या रणरागिणींचा प्रवास, ज्यांनी साचेबद्ध विचारांना छेद देऊन हृदयस्पर्शी 'फोटो स्टोरीज' विकसित केल्या. प्रेरणादायी यशोगाथाः एकूण ४० महिला छायाचित्रकारांच्या कहाण्या ज्या केवळ माहिती देत नाहीत, तर नव्या पिढीला जगण्याची नवी दृष्टी आणि प्रेरणा देतात. का वाचावे ? काही परिचित तर काही नवीन, पण प्रत्येकीची जिद्द अफाट ! स्त्रीवादी विचारांना कृतीची जोड देणाऱ्या या महिलांच्या ह्या यशोगाथा मनाला आणि हृदयाला भिडणाऱ्या आहेत, हे नक्की! आज सावित्रीबाई फुले असत्या तर त्यांना आपल्या लेकींना या उंचीवर पाहून नक्कीच अभिमान वाटला असता. अडथळ्यांची शर्यत पार करून स्वतःचे विश्व निर्माण करणाऱ्या या महिला छायाचित्रकारांचा हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येक कलाप्रेमीने आणि वाचकाने आवर्जून वाचावा असाच आहे! महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील महिला फोटोग्राफर्सच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाशझोत टाकणारे प्रवीण घोडेस्वार यांचे हे पुस्तक म्हणजे वेगळ्या वाटेवरल्या स्त्रियांच्या कामगिरीचा मौलिक असा दस्ताऐवज आहे, यात शंका नाही !

लेखक. डॉ. प्रवीण घोडेस्वार 
प्रकाशक. भाग्यश्री प्रकाशन 

View full details