Akshardhara Book Gallery
Chahur (चाहूर)
Chahur (चाहूर)
Share
Couldn't load pickup availability
Author: Samir Gaikwad
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 231
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
चाहूर
"खरंतर आभाळाचाही गणगोत मातीतच असतं
पऊलवाटांचा आसरा घेत आभाळ मातीत उतरतं !
लेखक, कवी त्याला पावसाचं नाव देतो.
पण पाऊस म्हणजे तरी काय असतो?
वाडवडलांचा सांगावा आभाळातून घेऊन येणारा तो आपलाच एक 'भाऊबंद' असतो.
त्यांच्या आनंदाश्रूंचा खारट थेंब असतो !
म्हणूनच सारं चराचर व्याकुळ होऊन पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करत असतं.
ऋतू कोणताही असो त्यातील पर्जन्योत्सुक नभातलं ओझं हळूहळू रितं होत जातं,
वसुंधरा तृप्त होते. ही तृप्ती सारस्वतांच्या लेखणीला उभारी देते, त्यात इंद्रधनुष्यी रंग भरते.
मग आयुष्याच्या नागमोडी पऊलवाटांचा प्रवास अक्षरगंधाने भरून जातो,
बघता बघता साथ उत्तराची शब्दकहाणी सुफळ होते.
इतकी जादू एका पावसाने होते !
पर्जन्यकाळातील आभळगाण्यांची ही ताकद अनोखी आणि अभूतपूर्व असते !..."
प्रकाशक. मनोविकास प्रकाशन
लेखक. समीर गायकवाड
