Akshardhara Book Gallery
Chaldhakal ( चालढकल )
Chaldhakal ( चालढकल )
Share
Couldn't load pickup availability
Author: Patrick King
Publisher: MyMirror Publishing House
Pages: 192
Edition: Latest
Binding: Papeback
Language:Marathi
Translator: Shriya Joshi
चालढकल
कोणत्याही कामात केलेला आळस किंवा चालढकल, आपल्याला अनेक सुवर्णसंधींपासून वंचित ठेवते. चालढकल हा एक असा राक्षस आहे, ज्याला टाळण्याची आपली इच्छा असते पण आपण त्यात फार कमी वेळा यशस्वी होतो. चालढकल केल्यामुळे आपण आयुष्यात पुढे जाण्याऐवजी उलट मागेच जातो. चालढकल करण्याची सवय आपल्याला अपराधीपणाची भावना तर देतेच पण त्याचबरोबर समाजातील आपल्या प्रतिमेलाही धक्का पोहोचवते. हे पुस्तक तुम्हाला चालढकल करण्याच्या सवयीवर, बेशिस्तपणावर मात कशी करायची हे सांगते. त्याचबरोबर तुमची कार्यक्षमता वाढवून निर्धारित वेळेत तुमचं ध्येय पूर्ण करण्यात मदत करते. या पुस्तकामध्ये चालढकल करण्यामागील जैविक आणि उत्क्रांतीवादी शास्त्र उलगडून दाखवलं आहे. चालढकल करण्याच्या प्रवृत्तीला सहजपणे कसं पराभूत करावं आणि तुमच्या करिअर व वैयक्तिक जीवनात प्रगती कशी करावी, याचं मार्गदर्शन हे पुस्तक करतं. या पुस्तकात आपल्या प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू असणाऱ्या चालढकलीची लक्षणं कशी ओळखावी ?चालढकल करण्याच्या प्रवृत्तीवर मात कशी करावी ?
चालढकल टाळण्यासाठी निरनिराळी धोरणे आणि उपाययोजना चालढकल प्रवृत्तीवर मात करून कार्यक्षमता कशी वाढवावी ? चालढकलीवर मात करण्यासाठी भौतिक शास्त्राच्या नियमांचा उपयोग पॅट्रिक किंग हे सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथील एक सामाजिक संवाद तज्ज्ञ आहेत. ते पॅट्रिक किंग कन्सलटिंग ही संस्था चालवतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बेस्ट सेलर लेखक आहेत. ते सामाजिक, संभाषण कौशल्ये आणि संवाद कला शिकवतात.
प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस
