Akshardhara Book Gallery
Chamblechya Palikade (चंबळेच्या पलीकडे)
Chamblechya Palikade (चंबळेच्या पलीकडे)
Couldn't load pickup availability
Author: S S Desai
Share
Publisher: Mehta Publishing House
Pages: 452
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
चंबळेच्या पलीकडे
महादजी शिंदे हे पेशवाईतील एक झळाळतं पर्व होतं. त्यांनी दौलतीची निरपेक्ष सेवा केली. भाऊसाहेब पेशव्यांच्या तोतयाचं प्रकरण असो किंवा नानांना हटवू पाहणाऱ्या मोरोबा, बापूंचा डाव असो, रघुनाथरावांनी इंग्रजांशी सलोखा करून पेशवाईच्या विरोधात केलेलं बंड असो, करवीरकरांनी पेशव्यांना दिलेला शह असो, या सगळ्या प्रसंगांत नानांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले महादजी; पण त्या बदल्यात महादजींना काय मिळालं, तर नानांचा अविश्वास, तुकोजी होळकरांचं आणि अन्य सरदारांचं शत्रुत्व; पण तरीही आपल्या विश्वासू सरदारांना हाताशी धरून, कवायती फौज निर्माण करून महादजींनी उत्तरेवर मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. पुण्यात एककल्ली कारभार करणाऱ्या आणि सवाई माधवराव पेशव्यांना कह्यात ठेवू पाहणाऱ्या नानांना वठणीवर आणलं महादजींनी. दौलतीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावणाऱ्या महादजींच्या स्वामिनिष्ठेचा, त्यांच्या पराक्रमाचा धगधगता आविष्कार.
लेखक. स. श. देसाई
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस
