Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Chandanachi Shidi (चंदनाची शिडी)

Chandanachi Shidi (चंदनाची शिडी)

Regular price Rs.211.50
Regular price Rs.235.00 Sale price Rs.211.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Chandrakant Devtale

Publisher: Varnamudra Publishers

Pages: 136

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

चंदनाची शिडी

प्रिय सर,  माझ्या हिंदी इतकंच तुमचं मराठी वाईट असल्यानं आपण एकमेकांना खूप हसायचो. पण जातांना थोपटत तुम्ही मला आश्वस्त करायचे की, हिंदी हिंदी होती है भईया वो टुटीफुटी नहीं होती. और तुम्हारी टुटीफुटी है तो मेरी भी वैसीही है. मोजक्या चार पाच भेटींत आणि फोनवर आपण किती किती बोललो. कमल ताई असतानाचे तुम्ही आणि त्या गेल्यावरचे तुम्ही अशी तुमची दोन्ही रूपं पाहिलीत. तुम्हांला काही लपवता यायचं नाही. लपविण्यासारखं आहेच काय माझ्यापाशी, असं तुम्ही म्हटलंच आहे. खैर, तुम्ही असताना हे पुस्तक आलं असतं तर तुम्हांला मनातून आनंद झाला असता. उज्जैनच्या तुमच्या अंगणात बसून पुस्तक उलटंपालटं करत तुम्ही मिश्कीलपणे म्हणाला असता - देखो अब महाराष्ट्र में पत्थर बरसेंगे, वो उज्जैन तक तो नहीं आएंगे सो अब तुम्हे ही झेलना पडेगे. आणि तुम्ही तोंडासमोर आडवी मूठ धरत उत्पल दत्तसारखे हा हा करत हसला असता, मी खो खो खिदळलो असतो. आवारातील तुमच्या पाच कुत्र्यांपैकी एखादा दचकून व वरमून तुमच्या पायाशी येऊन माझ्याकडे पाहत बसला असता. - आता ह्या सगळ्या राहून गेलेल्या आठवणींना.

लेखक. चंद्रकांत देवताले 
प्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स 

View full details