Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Cinema 'Scope' (सिनेमा 'स्कोप')

Cinema 'Scope' (सिनेमा 'स्कोप')

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Suhas Kirloskar

Publisher: Manovikas Prakashan

Pages: 295

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Cinema 'Scope' (सिनेमा 'स्कोप')

चित्रपटाची कथा सांगणे म्हणजे चित्रपट विश्लेषण नव्हे. ती कथा दृक श्राव्य (audio visual) माध्यमातून सांगताना एकेक प्रसंग पटकथेमधून खुलवले जातात, दिग्दर्शक सिनेमॅटोग्राफरच्या मदतीने दृश्ये परिणामकारकरीत्या दाखवतात, त्यावेळी अंधार - प्रकाशाचा खेळ केला जातो,
साउंड डिझाईन कल्पकतेने केले जाते.
प्रॉडक्शन डिझाईनमधून व्यक्तिमत्त्व उभे केले जाते, आरसा-पायऱ्या अशा माध्यमांचा वापर सूचकपणे केलेला असतो.
या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे चित्रपट. अशा अनेक बाबींचा विचार करून
चित्रपट डोळसपणे कसा बघावा,
वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट का आणि कसे बघावेत, याचं दिशादर्शन म्हणजेच 'सिनेमास्कोप' हे पुस्तक होय!
इंग्रजी-हिंदी-मराठी चित्रपटातील
शॉट्सची अनेक उदाहरणे वाचता-बघता
चित्रपट कला समजून घेणे, हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. त्या अनुषंगाने चित्रपट बघण्याचे तंत्र समजून देताना काही तांत्रिक बाबींचा उल्लेख केला आहे. चित्रपट बघताना या प्रत्येकाचे वेगळे भान ठेवून तो बघितला जात नसतो, त्याचा एकत्रित परिणाम प्रेक्षकांवर अप्रत्यक्षरित्या होत असतो. मात्र पहिल्या वेळेस चित्रपट बघताना कथा समजून घेण्याला प्राधान्य दिले जाते. म्हणूनच निवडक चित्रपट दुसऱ्या वेळेस बघताना कथेच्या पलीकडे बघण्याची सवय लावल्यानंतर एखादा चित्रपट नेमका का आवडला, हे उमजते.
चित्रपटाची ही समज-उमज वाढवणारं सुहास किर्लोस्कर लिखित हे पुस्तक आपल्या संग्रहात असायलाच हवं.

लेखक: सुहास किर्लोस्कर 
प्रकाशक: मनोविकास प्रकाशन 

View full details