Akshardhara Book Gallery
Dalit Kaviteche Ardhshatak (दलित कवितेचे अर्धशतक)
Dalit Kaviteche Ardhshatak (दलित कवितेचे अर्धशतक)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr Mahendra Bhavre
Publisher: Maharashtra Rajya Sahitya Ani Sanskruti Mandal
Pages: 468
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
दलित कवितेचे अर्धशतक
डॉ. महेंद्र भवरे हे मुंबई विद्यापीठात मराठी विषयाचे अध्यापक आहेत. कवी, समीक्षक आणि संशोधक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 'चिंताक्रांत मुलुखाचे रुदन', 'महासत्तेचे पीडादान' हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. 'दलित कवितेतील नवे प्रवाह', 'मराठी कवितेच्या नव्या दिशा', 'दलित कविता आणि प्रतिमा' हे समीक्षा ग्रंथ बहुचर्चित ठरले. 'प्रेमानंद गज्वी यांचा लेखन प्रवास' या ग्रंथाच्या संपादनासह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी वाङ्मयेतिहासाच्या आठ पुस्तकांचे संपादन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार, अनुष्टुभ प्रतिष्ठानचा विभावरी पाटील वाङ्मय पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा समीक्षक पुरस्कार, प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कारासह विखे-पाटील पुरस्कार, शरदचंद्र मुक्तीबोध पुरस्कार, कविता राजधानी, नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार इत्यादी विविध पुरस्कारांनी सन्मानित. फुले आंबेडकरी साहित्य संमेलन आणि आंबेडकर युवा साहित्य संमेलन अशा दोन संमलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
हँडलिंग चार्जेस ६०/- ( पुस्तक किंमत = ८७९ + ६०= ९३९)
लेखक. डॉ. महेंद्र भवरे
प्रकाशक. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
