Akshardhara Book Gallery
DANOLISHWAR (दाणोलीश्वर)
DANOLISHWAR (दाणोलीश्वर)
Couldn't load pickup availability
Author: KAMALVALLABHDAS , PRASANNA HARISHCHANDRA PARAB
Share
Publisher: Punarvasu Prakashan
Pages: 320
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
DANOLISHWAR (दाणोलीश्वर)
या ग्रंथाचे दोन भाग असून पहिल्या भागात सावंतवाडीच्या इतिहासापासून ते समाधी पर्यंतचा भाग असून दुसरा भाग परिशिष्टाचा आहे. पहिल्या भागात सावंतवाडीचा इतिहास, पाच खेम सावंतांच्या वेळी असलेल्या संतांच्या चरित्राचा सारांश रुपाने आढावा, कोकणची उत्पत्ती, साटम घराण्याचा इतिहास, समर्थांचे गुरु प. पू. अब्दूल रहिमान बाबा यांचे चरित्र, मुंबई ते दाणोली पर्यंतचे समर्थांचे प्रवास वर्णन आहे. यामध्ये अत्यंत दुर्मिळ माहिती समाविष्ट आहे. पुढे दाणोलीला आल्यावर केलेल्या लीला, समर्थांचे वेळी सुरू झालेले उत्सव व समर्थांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या केलेला उपदेश, समाधीपर्यंतची वाटचाल व अखेरीस डॉ. राम भोसले या उच्च प्रतीच्या कर्मयोग्याचे समर्थांविषयीचे उद्गार इत्यादी भाग असून परिशिष्ट म्हणून असलेल्या दुसऱ्या भागात एकूण तीन भाग आहेत. पहिल्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी समर्थांनी केलेल्या प्रवासातील वास्तव्य, समर्थांनी स्थापन केलेल्या पादूका अथवा नंतर तयार झालेली मंदिरे आणि दाणोलीतील समर्थांच्या वस्तू व स्थळ तसेच केळवा रोड येथील मंदिरात होणारे उपक्रम यांची छायाचित्रे, दुसऱ्या भागात समर्थांच्या एकनिष्ठ भक्तांची चरित्रे घेवून तेच बेल समजून समर्थचरणी बिल्वार्पण केले असून पुढील भागात समर्थांचे जन्म टिपण ज्योतिषाचार्य श्री. दत्ता कुलकर्णी यांच्या आधारे घेतले आहे. शेवटी केळवा रोड येथील पादुका मंदिराची माहिती आहे.
आधी जेवढी समर्थांची चरित्रे लिहिली गेली, ती ज्यांनी लिहिली, त्या सर्व ज्ञात-अज्ञात चरित्र लेखकांना करून हा ग्रंथ वाचकांच्या हाती देत आहे... कमलवल्लभदास (प्रसन्न हरिश्चंद्र परब)
लेखक: कमलवल्लभदास , प्रसन्न हरिश्चंद्र परब
