Nav Jag Nav Sahitya ( नव जग नव साहित्य )
Nav Jag Nav Sahitya ( नव जग नव साहित्य )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सुमारे पंचविस वर्षांपूर्वी भारतात जागतिकीकरणाने प्रवेश केला. कुठल्याही नव्या कल्पनेला व्हावा तसा त्याचा प्रखर विरोध झाला. देशातल्या सिविल सोसायटी ने जागतिकीकरणाला आरिष्ट मानून त्यावर हल्ले चढवलेत. पण कालांतराने ते थंडावले. कारण जागतिकीकरणात ह्या गटाचे सुध्दा आर्थिक हितसंबंध लपलेले होते. नव्या काळात आपण सारे उपभोक्ता समाजाचे आजीवन सभासद झालो. आज सगळ्यांना आर्थिक समृध्दी हवीहवीशी वाटू लागली. त्यात अनैतिक अस काही नाही. मात्र ह्या नव्या अर्थवादाने आपली साहित्य संस्कृती तळापासून ढवळून निघाली. त्याचे भलेबुरे परिणाम आहेत जागतिकीकरणानंतर प्रादेशिकता, देशीयता, आधुनिकता, उत्तरआधुनिकता, इलेक्ट्रॉनिक मिडियाची मानवी मनावर सर्वंकश सत्ता आणि देशांतर्गत सुरू झालेल अस्मितेच राजकारण इत्यादी गोष्टींना नवा बहर आला. आज आपण ह्या बहराचे लाभार्थी झालो आहोत. त्यामुळे आपण अंतर्यामी बदलत चाललो आहे.
Author | :Vishram Gupte |
Publisher | :Deshmukh & Co Publishers Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :256 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |