Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Deshodeshichya Laghukatha ( देशोदेशीच्या लघुकथा)

Deshodeshichya Laghukatha ( देशोदेशीच्या लघुकथा)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Rohini Bagal

Publisher: Mehta Publishing House

Pages: 181

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Rohini Bagal

देशोदेशीच्या लघुकथा 

जागतिक कीर्तीच्या साहित्यिकांनी लिहिलेल्या कथांचं हे संकलन. मानवी मनाचे पापुद्रे उलगडणाऱ्या आणि मानवी जीवनाचा आरसा दाखवणाऱ्या या कथा आहेत. स्यू आणि जोहन्सी या चित्रकार मैत्रिणींच्या मनोव्यापारांतून जीवन-मृत्यूची सीमारेखा, माणसाची स्वप्नं आणि नियतीची अतर्व्यता यांचं दर्शन 'अखेरचे पान' ही कथा घडवते. कुत्रा चावल्याचा कांगावा करून पैसे उकळू पाहणारा इसम आणि मग त्या प्रसंगी, सोयीस्करपणे पक्ष बदलणारा पोलीस अधीक्षक, या व्यक्तिरेखांचं 'रंग बदलणारा सरडा' ही कथा रंगतदार चित्रण करते, तर 'स्वार्थी राक्षस' मधून चित्रित झालाय एका राक्षसाचा स्वार्थांधतेकडून उमदेपणाकडे झालेला प्रवास.

'काळा बुरखा' कथेतून फाशी गेलेल्या तरुण मुलाची आई आणि नुकतीच प्रॅक्टीस सुरू केलेला डॉक्टर यांच्यातील भावबंध गूढ वातावरणाच्या पार्श्वभूमीवर उलगडतो. तर 'गार्डन पार्टी' कथेत श्रीमंत घरातील पार्टी आणि त्याच वेळी त्या घरासमोरच्या गरिबांच्या वस्तीत एका तरुण माणसाचा झालेला मृत्यू, या विरोधाभासी प्रसंगांच्या चित्रणातून मानवी जीवनातील सत्य अधोरेखित होतं.

मनोव्यापार आणि जीवनदर्शनाची कलात्मक गुंफण असलेल्या कथांची ही एक झलक. अन्य कथाही याच वैशिष्ट्यांनी सजलेल्या.

अनुवाद : रोहिणी बागल  
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details