Akshardhara Book Gallery
Devi Rakshti Rakshitah (देवी रक्षति रक्षितः)
Devi Rakshti Rakshitah (देवी रक्षति रक्षितः)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sau. Sarika Kandalkar
Publisher: MyMirror Publishing House
Pages: 336
Edition: Paperback
Binding: Latest
Language:Marathi
Translator:
देवी रक्षति रक्षितः
"ऐहीं क्लीं चामुंडा विच्चे...” जोरजोरात मंत्रोच्चारण ए सुरू होते. समोरच कालीमातेची एक मोठी मूर्ती उभी होती. त्या मूर्तीकडे बघूनच भल्या भल्यांच्या हृदयाचा ठोका चुकत असेल. मूर्तीच्या गळ्यात वेगवेगळ्या माळा दिसत होत्या. त्यातल्या फुलांच्या माळा तिला ओळखू आल्या. पण बाकीच्या माळा एवढ्या दुरून तिला ओळखू येत नव्हत्या. त्या ओळखू याव्यात अशी तिची इच्छाही नव्हती. त्या विचारानेच जणू तिला अचानक थंडी वाजू लागली. तिने ओढणीने अंग झाकून घ्यावे म्हणून हात हलवले. ओढणी शोधतानाच तिला अचानक आपल्या अंगावर एकही वस्त्र नसल्याचे जाणवले. फुलांचा येत असलेला मंद सुवास आणि अंगाला होणारा थंडगार स्पर्श फक्त फुलांच्या माळा आपल्या शरीरावर असल्याची जाणीव करून देत होत्या. भीतीने, शरमेने तिच्या अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आले. तिला इथून निघून जायचे होते. पण पायात जणू मणाच्या बेड्या होत्या. तिचे पूर्ण अंग कशालातरी जखडले होते. इथून सुटका होणे अशक्य होतेच पण अंगावर वस्त्रही नसल्याने सुटकेची छोटीशी आशा जी मनात होती तीही मावळली होती. समोर होमकुंड धगधगत होते. एकजण देवीची जोरजोरात प्रार्थना करत होता. त्याचा चेहरा मात्र तिला दिसत नव्हता. समोर एक रेडा बांधलेला होता. तिथे एक बलीवेदी दिसत होती. त्या रेड्याचे भवितव्य तिला क्षणार्धात कळले. त्या रेड्याला समोर आणले गेले. ते खड्ग उचलले गेले. न राहवून ती जोरात किंचाळली.. "थांबा..."
लेखक : सौ.सारिका कंदलगावकर
प्रकाशन : मायमिररर पब्लिशिंग हाऊस
