Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Dharma... Kabiranchya Manatla (धर्म....कबीरांच्या मनातला)

Dharma... Kabiranchya Manatla (धर्म....कबीरांच्या मनातला)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Osho

Publisher: Mehta Publishing House

Pages: 152

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Pradnya Oak

धर्म....कबीरांच्या मनातला

'धर्म' हा शब्द सध्या खूप नाजूक झालाय... प्रचंड स्फोटक तर तो आहेच... प्रत्येक संप्रदाय स्वतःच्या मनाप्रमाणे धर्माची मांडणी करतोय. 'आतून' परमात्मा पदाला पोचलेल्या व्यक्तीच्या जवळ स्वतः परमात्म्याला यावं लागतं.. या मिलनाला कुठलीही भाषा नसते, शब्द नसतात. कुठल्याही भावनेचा तरंग तिथे पोहोचू शकत नाही, तिथे कुठलाच रंग नसतो. एक ज्योत तिथे शांतपणे तेवत असते. ही 'आतमध्ये' घडणारी अलौकीक घटना जेव्हा बाहेर सांगायची वेळ येते तेव्हा संप्रदाय निर्माण होतो. संप्रदाय हे शब्दांच्या घराण्यात अडकतात... पण धर्म मात्र निःशब्द आहे. संप्रदाय शास्त्रात अडकतात पण धर्माला कुठलं शास्त्रच नाही. शून्य हे त्याचं शास्त्र आणि 'मौन' हीच त्याची वाणी... कबीरांच्या म्हणण्याप्रमाणे संप्रदाय खोटा आहे पण धर्म सत्य आहे. पण संप्रदायातूनच गीता, बायबल, इंजिल, अवेस्ता या ग्रंथांचा जन्म होतो. मग मंडळी तेच ओढत राहतात. पण त्यात 'धर्म' नाही. कबीरांनी 'आतल्या' जागरणाला खरा धर्म मानलंय या ग्रंथांना नाही. पण माणसं धर्म म्हणून हेच ग्रंथ आयुष्यभर ओढत राहतात. धर्माला तर माणसांनी रणभूमी करून टाकलंय.. धर्माचा एकच उपयोग म्हणजे सतत लढत राहणे. कबीर म्हणतात मंदीर, मशिदीत धर्म नाही. कारण त्या माणसानं बनवलेल्या आहेत. जिथे परमात्म्याचा ठसा असेल तिथेच धर्म आहे. मनुष्यातली चेतना ही सर्वांत मोठी आहे, महत्त्वपूर्ण आहे. तेच त्यांचं मंदीर आहे. तोच त्याचा धर्म आहे.

मूळ लेखक. ओशो 
अनुवादित लेखक. प्रज्ञा ओक 
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाउस  

View full details