Dhulakshare Itihasachi - Deshache Lok - Bhag 2 (धुळाक्षरे इतिहासाची - देशाचे लोक - भाग २ )
Dhulakshare Itihasachi - Deshache Lok - Bhag 2 (धुळाक्षरे इतिहासाची - देशाचे लोक - भाग २ )
Share
Author:
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 51
Edition: Latest
Binding: Paper pack
Language:Marathi
Translator:Prachi Deshpande
या पुस्तकात काय वाचाल ?
- भारत स्वतंत्र झाला आणि प्रजासत्ताक देश बनला, म्हणजे नक्की काय झालं?
- स्वतःच्याच देशात नागरिकत्त्व सिद्ध करण्याची वेळ लोकांवर का आली?
- स्वातंत्र्यापूर्व काळात हक्काचं गाव, घर असणाऱ्यांना स्वातंत्र्यानंतर स्थलांतरीत का व्हावं लागलं ?
- भारतात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती ही भारतीय असं एकदा ठरवल्यानंतर त्यात वेळोवेळी बदल का होत गेले?
- नागरिकत्त्वाचा नवा कायदा काय आहे? त्याने घुसखोर ठरलेल्या नागरिकांना काय त्रास सहन करावा लागतोय ?
डोळे आणि कान उघडे ठेऊन इतिहास कसा शिकायचा? इतिहासाचे भान असणे म्हणजे काय ? पाठ्यपुस्तकांत सांगितलेल्या इतिहासापलीकडचा, सर्वसामान्य लोकांचा इतिहास मुलांनी कसा जाणून घ्यायचा? या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधातून 'धुळाक्षरे इतिहासाची' या पुस्तकमालेचा जन्म झाला. 'देशाची फाळणी', 'देशाचे लोक' आणि 'देशाच्या भाषा' अशी मूळ बंगाली भाषेतील तीन पुस्तकं या मालिकेत अनुवादित केली आहेत. निराळ्या प्रादेशिक दृष्टीकोनांतून सांगितलेला हा इतिहास मुलांसह सर्वांनाच विविध प्रांतांच्या इतिहासाकडे अधिक आकर्षित करेल आणि इतिहासाबद्दल प्रश्न विचारायला उद्युक्त करेल, अशी आमची आशा आहे.
या पुस्तकाचे लेखक : तिस्ता दास , अनुवाद: प्राची देशपांडे , प्रकाशक: मनोविकास प्रकाशन.