Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Dirgha (दीर्घ)

Dirgha (दीर्घ)

Regular price Rs.399.60
Regular price Rs.444.00 Sale price Rs.399.60
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Ganesh Vaman Kanate

Publisher: Varnamudra Publishers

Pages: 145

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

दीर्घ

प्रस्तुत पुस्तकात गणेश कनाटे यांचे तीन महत्त्वाचे निबंध एकत्रित केलेले आहेत. भालचंद्र नेमाडे यांचा देशीवादाचा सिद्धान्त, दीर्घकविता या काव्यप्रकाराचा रूपबंध, आणि मराठी समीक्षेच्या संदर्भात विश्वभानाचा विचार अशा महत्त्वाच्या विषयांवर हे निबंध लिहिलेले आहेत. या निबंधांचे लेखन विद्यापीठीय शिस्तीने केलेले, चिकित्सक, विचार-विमर्श पद्धतीने केलेले असल्यामुळे ते महत्त्वाचे ठरलेले आहे. 'दीर्घकविता : स्वरूप आणि गुणलक्षणे' या निबंधात कनाटे यांनी महाकाव्य, खंडकाव्य, एपिक या काव्यप्रकारांच्या रूपबंधांची लक्षणे स्पष्ट करून दीर्घकविता या प्रकाराचा रूपबंध यांहून वेगळा कसा आहे हे स्पष्ट केलेले आहे. त्याचप्रमाणे भावकवितेच्या रूपबंधाहून दीर्घकवितेच्या रूपबंधाचे निराळेपण नेमके कशात आहे याचे विवेचन त्यांनी केले आहे. दीर्घकविता म्हणजे दीर्घ भावकविता, दीर्घ चिंतनगर्भ कविता, दीर्घ कथाकविता, दीर्घ नाट्यकविता नव्हे, किंवा दीर्घ गीत नव्हे. हे सर्व घटक दीर्घकवितेत असू शकतात, तरीही तिचा रूपबंध वेगळा असतो असे कनाटे यांचे प्रतिपादन आहे. चिंतनशीलता, कथनात्त्ममकता, अनेक संदर्भयुक्तता, बहुआवाजी भाषा, अर्थांची बहुलता असलेली रचना म्हणजे दीर्घकविता असा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे. दीर्घकवितेच्या रूपबंधाबाबत अपवादात्मक लेखन झालेले असताना कनाटे यांचे काम मोलाचे आहे. 'मराठी समीक्षेला जागतिक भान असणे म्हणजे नेमके काय' या निबंधात कनाटे यांनी मराठीतील समीक्षाव्यवहाराचा धांडोळा घेऊन त्यांतील दोष, अभाव स्पष्टपणे सांगितले आहेत. मराठीतील समीक्षकांचे जागतिक भान हे किती क्षीण, वरवरचे आणि तोकडे आहे याची जाणीव ते करून देतात. त्याचप्रमाणे भारतीयांच्या साहित्यविज्ञानाबाबतही आपण किती उदासीन आहोत याविषयीची खंतही ते व्यक्त करतात. म्हणजे धड पाश्चिमात्य साहित्यसिद्धान्तांचा अभ्यास नाही, आणि भारतीय साहित्यसिद्धान्तांचेही ज्ञान नाही अशा आमच्या समीक्षकांविषयी त्यांना होणारा खेद प्रांजळपणे ते व्यक्त करतात. मराठीतील तत्त्वज्ञ समीक्षकाची अनुपस्थिती त्यांना खटकते, फ्रैंकफुर्ट स्कूलसारखे काम आपल्याकडे होईल का याविषयी शंका वाटते. मराठी समीक्षेत काही काम करायचे इच्छा असलेल्यांनी हा निबंध वाचलाच पाहिजे. 'नेमाडेप्रणीत देशीवादाची कालबाह्यता' या निबंधात कनाटे यांनी बहुचर्चित देशीवादाविषयीचे आक्षेप परखडपणे व्यक्त केले आहेत. असे करताना 'देशीवाद' केंद्रस्थानी ठेवलेला असल्यामुळे अकादमिक असे रूप या निबंधाला लाभले आहे. खूप संदर्भानी युक्त अशा या निबंधात कनाटे यांनी देशीवादाची जी चिकित्सा केली आहे, ती अनन्य आहे. - वसंत आबाजी डहाके

संपादक. गणेश वामन कनाटे 
प्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  

View full details