Akshardhara Book Gallery
Disha Aani Vata ( दिशा आणि वाटा)
Disha Aani Vata ( दिशा आणि वाटा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Ashutosh Javadekar
Publisher:
Pages: 191
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
दिशा आणि वाटा - काही प्रवासनोंदी
डॉ. आशुतोष जावडेकर हा जगण्यावर, गाण्यावर, शब्दांवर आणि प्रवासावर प्रेम करणारा गोष्टीवेल्हाळ माणूस आहे. विविध क्षेत्रांत वावरताना सैलमोकळा वाटणारा हा माणूस दिशा आणि वाटांबाबत पक्का आहे. आपल्याला कोठे व का जायचे आहे, याची पक्की जाण त्यांना आहे. त्यांनी आपल्या देशा-परदेशातील प्रवासाच्या कथनांना प्रवासनोंदी म्हटले आहे खरे; पण त्या केवळ नोंदी न उरता त्यापलीकडची संस्मरणे झाली आहेत. पॅरिस ते बाली व्हाया मदुराई फिरताना त्या त्या ठिकाणांना लगटून काही आठवणी येतात, तर कधी तेथील कहाण्यांमधून, माणसांमधून, निसर्गदृश्यांमधून या लेखकाचे रमणेही दिसते. आपल्या नेहमीच्या चाकोरीतून बाहेर पडून वेगवेगळ्या मार्गांनी जीवन अनुभवण्याचा मार्ग या प्रवासवर्णनांतून दिसतो. त्याचबरोबर कित्येकदा हा प्रवास केवळ बाह्य स्वरूपाचा नाही, तर तो आतलाही प्रवास आहे, हेही जाणवत राहते. डॉ. जावडेकर केवळ ठिकाणांचे, त्यांच्या काळाचेच वर्णन करून थांबत नाहीत, तर इतिहास आणि संस्कृतीच्या मुद्द्यांनाही ते स्पर्श करतात. अशा वेळी त्यांच्या गद्यातील साधेपणा परकीय संदर्भही बोजड होऊ देत नाहीत. ते प्रवासाचा अनुभव खूप ताज्या मनाने घेतात आणि साहजिकच त्या उल्हसित मनाने त्यांनी केलेले हे वर्णन रोमँटिक होते. त्यात सहजता आहे. ते तुम्हाला बोट धरून त्या त्या ठिकाणी घेऊन जातात. वाचकांच्या सांस्कृतिक दृष्टिकोनाचा विस्तार करणारे हे लेखन आहे.
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन