Katha Istrochi ( कथा इस्त्रोची )
Katha Istrochi ( कथा इस्त्रोची )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
उच्च शिक्षण घेऊन नव्या दमाने राष्ट्रीय कामात सहभागी होण्यासाठी आलेले वसंत गोवारीकर नव्यानेच सुरु झालेल्या अंतरिक्ष संशोधन संस्थेत रुजू झाले. त्यात त्यांना आलेले अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांपुढे ठेवले आहेत. भारताला जगातल्या सहा प्रगत राष्ट्रांच्या रांगेत नेऊन ठेवणारी अंतरिक्ष संशोधन कार्यातील झेप खरोखरीच अचंबित करणारी अहे.
डॉ. विक्रम साराभाईंसारखी दूरदृष्टी असलेली व्यक्ती व कामाशी समरसून गेलेले हजारो शास्त्रज्ञ यांच्या संघटित प्रयत्नांमधून खडकाळ टेकडीवर, पूर्णत: भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान शून्यातून विकसित करून, अवकाश क्षेत्रात जी मुसंडी मारली त्याची ही प्रेरणादायी कहाणी!
कामाबद्दलची आत्मीयता, दुसर्याचे गुण जाणण्याची क्षमता अन सहज संपर्काची कला यामुळे त्यांची शैली वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. त्या शैलीतून लिहिलेले हे अनुभव विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्व वयोगटातील वाचकांना आवडतील आणि भव्यदिव्य स्वप्ने पाहण्याची व ती साकारण्याची प्रेरणा देत राहतील असा विश्वास वाटतो.
Author | :Vasant Govarikar |
Publisher | :Dnyan Prabodhini |
Binding | :Paperback |
Pages | :104 |
Language | :Marathi |
Edition | :2003 |