Akshardhara Book Gallery
Dr. Dam – Bhag 3 (डॉ. डॅम - भाग ३)
Dr. Dam – Bhag 3 (डॉ. डॅम - भाग ३)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Kumar Nanaware
Publisher: Bhagyashree Prakashan
Pages: 136
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
डॉ. डॅम - भाग ३
डॉक्टर डॅम भाग-३, डॅम व खोटा खुनी ही प्रदीर्घ कथा किंवा क्राईम कादंबरी आहे. यापूर्वीचे डॉ. डॅम-१ व डॉ. डॅम-२ हे कथासंग्रह होते तर डॉक्टर डॅम भाग-३ (खोटा खुनी) ही कादंबरी जरी काल्पनिक असली तरी फॉरेन्सिक सायन्स व त्याचा उपयोग खरा आहे. अंतर्गत तपासणी, ऊतकांचे नमुने, मृत्यूचे कारण ठरवण्यासाठी पोस्टमार्टम केले जाते. नैसर्गिक मृत्यू आणि अनैसर्गिक मृत्यू व त्यातच गुन्हेगारींचा तपास करण्यासाठीच पोस्टमार्टमची गरज लागते. ह्यामध्ये पोलिस पंचनामा आणि डॉक्टरांचे रिपोर्ट ह्यांचे महत्व येथे अधोरेखित होते. या कथेत सांगितलेले क्राईम जगात कुठेही घडू शकतात. खुनी माणूस कितीही हुशार असला तरी, तो चुका करतोच व त्याला शिक्षा करता येतेच हा संदेश या पुस्तकात दिला आहे.
लेखक. डॉ. कुमार ननावरे
प्रकाशक. भाग्यश्री प्रकाशन
