Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Durgraj Rajgad (दुर्गराज राजगड)

Durgraj Rajgad (दुर्गराज राजगड)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: P. K. Ghanekar

Publisher: Snehal Prakashan

Pages: 135

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

दुर्गराज राजगड 

महाराष्ट्र हा दुर्गांचा देश. 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग' असं मानणाऱ्या शिवरायांनी आयुष्यभर दुर्गकारण केले. आपल्या वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्यांनी एका उत्कृष्ट गिरिदुर्गाचं स्वप्न पाहिलं. त्यातूनच साकारला 'राजगड' हा पहिला शिवनिर्मित दुर्ग ! आता तर या दुर्गश्रेष्ठाला युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळालं आहे! 
‘राजगड गिरिदुर्ग' हा ‘लढाऊ किल्ला' आहे. इतरत्र आहेत, तसा हा तटबंदीयुक्त राजप्रासाद नाही. 
त्यामुळेच तेथे अलिशान हवेल्या, उत्तम बागा, थुई थुई नाचणारी कारंजी दिसणार नाहीत. लढाऊ 
किल्ला म्हणून याची जडणघडण केल्याने, त्यातील लढाऊपणाची मुख्य गमके कोणती ? याकडे 
लक्ष वेधलं जाणं अगत्याचं ठरतं. प्रख्यात दुर्ग अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर सरांनी आपल्या 'दुर्गराज राजगड' 
या नव्या पुस्तकात ते सारं सांगितलं आहेच. पण राजगडावर घडलेल्या घटना, तेथील वास्तु अवशेष, 
बालेकिल्ल्याच्या खड्या चढणीच्या जागी पूर्वी असलेल्या पायऱ्यांचा मार्ग, केवळ राजगडावरच आढळणाऱ्या 
दुर्मीळ वन्यजीवांबद्दल आणि राजगड परिसरातील काही ठिकाणी आढळलेल्या अश्मयुगीन मानवाच्या
 अस्तित्वाच्या खुणा याबद्दलही त्यांनी सखोल माहिती दिली आहे. भारत सरकारच्या टपालखात्याने 
राजगडासंदर्भात मुद्दाम प्रचलित केलेल्या डाक-लिफाफे (स्पेशल कव्हर्स) आपल्याला या पुस्तकात 
पाहायला मिळतील. दुर्गम दुर्ग राजधानी 'राजगड' या राजस किल्ल्याची माहिती आपल्याला 
या पुस्तकात तपशीलवार मिळणार आहे.

लेखक : प्र. के. घाणेकर 

View full details