Akshardhara Book Gallery
Ek Patra Aaicha ! (एक पत्र आईचं !) By Pravin Davane
Ek Patra Aaicha ! (एक पत्र आईचं !) By Pravin Davane
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher: Dilipraj Prakashan
Pages: 158
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Ek Patra Aaicha ! (एक पत्र आईचं !)
Author : Pravin Davane
जगायचे व लढायचे बळ देणारा मध्यमवर्ग ही माझ्या वैचारिक लेखनाची प्रेरणा आहे. सत्त्वपरीक्षेच्या क्षणी मूल्यसंस्कार निग्रहाने जपणारी आई-वडिलांची पिढी मी अनुभवली आहे. गरिबीतही स्वाभिमानाची श्रीमंती मला आई-वडिलांकडून मिळाली. त्यांच्या कष्टांचे सार्थक करणे हीच ईश्वरपूजा, हे मला संतांच्या साहित्याने शिकवले. श्रेष्ठ साहित्यिक, थोर कलावंतांनी मानवतेचा विचार दिला. अपार कष्टाला पर्याय नाही हे सांगणारे चरित्रग्रंथ नंदादीपाप्रमाणे आयुष्यात आले. माझ्या लेखनामागे आणि जगण्यामागे बळ आहे ते त्या चिरंतन मूल्यश्रद्धांचे ! म्हणूनच 'एक पत्र आईचं!' हे माझे पुस्तक खरे तर 'एक पत्र लेखकाचं!' असंही आहे. हे लेखन आपल्या हाती सोपवताना आपणास होणाऱ्या आनंदातून पत्रोत्तर मला मिळणार आहे! - आपला प्रवीण दवणे