Ek Pay Jaminivar ( एक पाय जमिनीवर )
Ek Pay Jaminivar ( एक पाय जमिनीवर )
Share
Author:
Publisher:
Pages: 280
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:Karuna Gokhale
लेखिकेनं आपली जीवनकहाणी स्वत:च्या ‘शरीराच्या’ लोलकामधून पृथक करून सांगितली आहे. म्हणून तर पुस्तकाचं उपशीर्षक - 'अ लाईफ टोल्ड थ्रू द बॉडी' असं आहे. या जीवन कहाणीमध्ये लेखिकेचं ‘शारीर भान’ हा मुख्य कथेकरी आहे. लेखिका असं मानते की माणूस त्याच्या शरीराच्या माध्यमातून अस्तित्वात असतो. हे माध्यम त्याला नाकारताही येत नाही आणि बदलताही येत नाही. शरीर हे अंतिम जड सत्य आहे. विविध प्रसंगांमधून शरीर आपलं व्यवधान त्याच्याकडे खेचून घेतं. माणूस आपल्या विचारांमध्ये, मतांमध्ये, श्रद्धांमध्ये फेरफार करू शकतो, पण वैद्यकशास्त्राच्या मदतीनं शरीरात वरकरणी कितीही फेरफार केले, तरी आतून ते रोगप्रवण राहतंच. आपल्या मनानं, बुध्दीनं कितीही भराऱ्या घेतल्या, तरी अंतिमत: आपली उडी किती उंच जाणार हे काही अंशी तरी आपलं शरीरच ठरवतं. म्हणूनच, वयाच्या ७८व्या वर्षी लेखिका आतापर्यंत जगलेलं आयुष्य तळहातावर ठेवलेल्या आवळ्यासारखं सर्व बाजूंनी निरखत त्यातील कोणत्या वाटा शरीरानं आखून दिल्यामुळे तुडवाव्या लागल्या यांचा तटस्थपणे मागोवा घेते.
या पुस्तकाचे लेखक : शांता गोखले, अनुवाद : करूणा गोखले , प्रकाशक : पपायरस प्रकाशन