Akshardhara Book Gallery
Eka IAS Adhikaryachi Sangharshkatha (एका IAS अधिकाऱ्याची संघर्षकथा)
Eka IAS Adhikaryachi Sangharshkatha (एका IAS अधिकाऱ्याची संघर्षकथा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Bhavdeep Kang / Namita Kala
Publisher: Krishna Publications
Pages: 259
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Meena Shete - Sambhu
एका IAS अधिकाऱ्याची संघर्षकथा
अशोक खेमका यांची कारकीर्द म्हणजे आपल्या सदसद्विवेकबुद्धीला पटणाऱ्या निर्णयाच्या बाजूनं ठामपणे उभ्या राहणाऱ्या अधिकाऱ्याच्या बाबतीत काय घडतं याचं उदाहरण आहे. खेमकांनी त्यांच्या विश्वासांना, मूल्यांना सोडून न देता जीवनात त्यांच्या नीतिमत्तेचं पालन केलं. त्याकरिता त्यांनी मोठी किंमत चुकती केली आणि अनेक वेळा झालेल्या बदल्याही झेलल्या; पण आपल्या तत्त्वांशी ते प्रामाणिक राहिले याचा मला आनंद वाटतो.' -- यशवंत सिन्हा, भारताचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री
'एका विलक्षण माणसाविषयी लिहिलेलं एक विलक्षण पुस्तक. प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेत अशोक खेमका यांच्यासारखे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके, अगदीच थोडे लोक आहेत. खरं म्हणजे, अशा अत्यल्प अधिकाऱ्यांमुळेच देशातील प्रशासनाची गंजकी लोखंडी चौकट अद्याप पूर्णपणे ढासळलेली नाही. आजच्या समाजात प्रामाणिक लोकांची संपूर्ण गळचेपी करता आली नाही, तर त्यांना निदान मूर्ख तरी नक्कीच समजलं जातं, त्यामुळेच समाजात अशा लोकांचा शोध घेणं वाढत्या प्रमाणात अवघड होत चाललं आहे.' ---परणजॉय गुहा ठकुर्ता, पत्रकार, लेखक, प्रकाशक, शिक्षणतज्ज्ञ आणि अनुबोधपट निर्माता
मूळ लेखक. भवदीप कांग / नमिता काला
अनुवादित लेखक. मीना शेटे - संभू
प्रकाशक. कृष्णा पब्लिकेशन्स
