Akshardhara Book Gallery
Eka Studioche Aatmvrutta (एका स्टुडिओचे आत्मवृत्त)
Eka Studioche Aatmvrutta (एका स्टुडिओचे आत्मवृत्त)
Share
Couldn't load pickup availability
Author: Prabhakar Pendharkar
Publisher: Rajendra Prakashan
Pages: 200
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
एका स्टुडिओचे आत्मवृत्त
"मला तुमच्या आठवणी सांगाल काय?" ... कशाकरिता ?" "कशाकरिता ? मला तुमचं चरित्र लिहायचं आहे!" "चरित्र-आत्मचरित्र कलाकारांची, दिग्दर्शकांची लिहितात. स्टुडिओचं आत्मचरित्र लिहिलेलं मी ऐकलेलं नाही." "म्हणूनच मला लिहायचं आहे." "ह्या प्रभाकरला, मी त्याच्या लहानपणी वडिलांचा हात धरून इथं यायचा, तेव्हापासून पाहतो आहे. सत्तर वर्ष उलटली. आता मला हा 'आठवणी सांगा' म्हणतो आहे. ह्या मधल्या काळात त्यानं इथं काम केलं, मुंबईला गेला. हैद्राबाद, कलकत्ता, मद्रास येथील स्टुडिओ ह्यानं पाहिले. अमेरिकेतलेही पाहिले. त्या मानानं एका लहानशा शहरातला मी एक छोटा स्टुडिओ ! ह्याला माझं चरित्र का लिहायचं आहे?" "कारण आपलं जवळचं नातं आहे. तुमची भाषा मला समजेल. आणि तुम्ही जे पाहिलंत, अनुभवलंत, सोसलंत आणि निर्माण केलंत ते माझ्यासारखं आणखीनही काहींना ऐकायला आवडेल." "खरं आहे! उद्या मी असेन नसेन. हा लिहिणाराही नसेल. पण कागदावर लिहिलेला शब्द हा कॅमेऱ्यानं बंदिस्त केलेल्या प्रतिमेसारखाच ! तेव्हा मी आठवणी सांगायला सुरुवात केली..."
लेखक. प्रभाकर पेंढारकर
प्रकाशक. राजेंद्र प्रकाशन
