Akshardhara Book Gallery
Eka Yashasvi Urologistchi Vatchal ( एका यशस्वी युरोलाॅजिस्टची वाटचाल )
Eka Yashasvi Urologistchi Vatchal ( एका यशस्वी युरोलाॅजिस्टची वाटचाल )
Share
Couldn't load pickup availability
Author: Shilpa Shivalkar
Publisher: Rajhans Prakashan
Pages: 269
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
एका यशस्वी युरोलाॅजिस्टची वाटचाल
डॉ. शरद बापट यांच्या ९३ वर्षांच्या आयुष्याने सातारा, लाहोर, पुणे, अहमदाबाद, लंडन, मुंबई असा प्रवास केला आहे. पण हे पुस्तक म्हणजे निव्वळ डॉ. बापट यांचे आत्मकथन नाही. युरोलॉजी या वैद्यकीय शाखेच्या भारतातील वाटचालीचाही हा आलेख आहे. पूर्ण देशात ज्यांनी एंडोस्कोपिक युरोलॉजीचा पाया घातला, त्यात डॉ. बापट अग्रगण्य आहेत. मुंबईच्या सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेतील युरोलॉजीचा पहिला स्वतंत्र बाह्यरुग्णविभाग त्यांनी सायन इस्पितळात सुरू केला. शिक्षक म्हणून युरोलॉजिस्टांच्या चार पिढ्या त्यांनी घडवल्या. मूत्रपिंड आरोपणाच्या तंत्रावर हात बसावा म्हणून त्यांनी कुत्र्यांवर दोन वर्षे प्रयोग केले होते. तर अलिकडे रोबोटिक कॉन्सोल शस्त्रक्रियेचे तंत्र भारतात आणण्यातही त्यांचा पुढाकार होता. गेल्या ६० वर्षांतल्या या अचाट तांत्रिक प्रगतीचा प्रवास इथे सोप्या शैलीत उलगडून दाखवला आहे. त्याचबरोबर, वाढलेल्या प्रोस्टेटपासून लघवीची जळजळ होणे अशा नेहमीच्या तक्रारींवरच्या उपचारांचे अनुभव आणि त्याबाबतची निरीक्षणेही यामध्ये रंजकपणे मांडलेली आहेत. सामान्य वाचकांपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल, असा हा दस्तावेज आहे.
प्रकाशक : राजहंस प्रकाशन