Akshardhara Book Gallery
Elon Musk (इलॉन मस्क)
Elon Musk (इलॉन मस्क)
Share
Couldn't load pickup availability
Author: Walter Isaacson
Publisher: Madhushree Publication
Pages: 600
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Poonam Chatre
इलॉन मस्क
या पुस्तकाचे लेखक, वॉल्टर आयझॅकसन ज्येष्ठ चरित्रकार आहेत. या पुस्तकाचे नायक, इलॉन मस्क श्रेष्ठ उद्योगपती आहेत. चरित्राचे लेखन सुरू करण्याआधी, आयझॅकसन सतत दोन वर्षे मस्क यांच्यासोबत होते. मस्कही हळूहळू त्यांच्यापाशी मन मोकळे करायला लागले आणि आयझॅकसन मस्क यांच्या मोजक्या, जवळच्या लोकांपैकी एक झाले. या त्यांच्या सहवासातून, गप्पांतून हे चरित्र आकाराला आले आहे. आयझॅकसन यांना मस्क यांच्याबद्दल आत्मीयता वाटते, पण त्याचबरोबर त्यांनी त्यांचे स्वतःचे परखड मत आणि विचारही ठिकठिकाणी मांडले आहेत. हे पुस्तक अनेक कालखंडातून प्रवास करते. काही जुन्या प्रसंगांबाबत किंवा माणसांबाबत मस्क आत्ता टिप्पणी करतात, तेव्हा त्यांचा आजचा आब राखून त्यांचा ‘मस्क’ असा आदरार्थी उल्लेख पुस्तकात केलेला आहे. मात्र, त्या-त्या वेळेच्या घटना, भूतकाळात लिहिताना त्यांचा उल्लेख ‘इलॉन’ असा त्यांच्या नावाने, एकेरी केलेला आहे. शिवाय, अमेरिकन पद्धतीप्रमाणे, वय आड येऊ न देता, जवळपास सगळ्यांचा उल्लेख त्यांच्या संवादात एकेरीच असतो. इथेही तो तसाच केलेला आहे. संवादात बोलीभाषा, तर इतर वर्णनात मात्र प्रमाणभाषा वापरलेली आहे.
लेखक : वॉल्टर आयझॅकसन
प्रकाशन : मधुश्री पब्लिकेशन
