Akshardhara Book Gallery
Engineers Ghadavtana (इंजिनिअर्स घडवताना...)
Engineers Ghadavtana (इंजिनिअर्स घडवताना...)
Share
Couldn't load pickup availability
Author: Shailesh Kulkarni
Publisher: Bhagyashree Prakashan
Pages: 292
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
इंजिनिअर्स घडवताना...
एक अनुभवसंपन्न प्रवास
"अभियांत्रिकी प्रशिक्षण क्षेत्रात गेली ३३ वर्षे अखंड कार्यरत असलेले माझे स्नेही श्री. शैलेश कुलकर्णी यांचे 'इंजिनिअर्स घडवताना... एक अनुभवसंपन्न प्रवास' हे पुस्तक त्यांच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीला उत्तम आढावा घेणारं अप्रतिम लेखन आहे. घरातून व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना शून्यातून निर्माण केलेली संस्था नावारूपास आणणे आणि अनेक वर्षे ती प्रतिमा जपणे, हे निव्वळ विस्मयकारक आहे. कुलकर्णी सरांची व त्यांच्या सहकारी शिक्षकांची प्रामाणिक व अखंड मेहनत तसेच सचोटीपूर्ण व्यवहार यामुळे या संस्थेची प्रतिमा जनमानसात कायमच विश्वासार्ह राहिलेली आहे. हे पुस्तक म्हणजे या विलोभनीय प्रवासाची सफर घडविणारा एक मोलाचा दस्तऐवज आहे. मोलाचं मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ इंजिनिअरिंग करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संग्रही असायलाच हवा असा आहे.
- प्रा. (डॉ.) विनय भोळे
प्राचार्य, एम. एल. डहाणूकर कॉलेज
ऑफ कॉमर्स (स्वायत्त), विलेपार्ले, मुंबई
लेखक : शैलेश कुलकर्णी
प्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन
