Akshardhara Book Gallery
FTII Madhil Bharavlele Divas (एफ. टी. आय. मधील भारावलेले दिवस)
FTII Madhil Bharavlele Divas (एफ. टी. आय. मधील भारावलेले दिवस)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr Chandrashekhar Joshi
Publisher: Chaparak Prakashan
Pages: 128
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
एफ. टी. आय. मधील भारावलेले दिवस
आमच्या 'एफटीआयआय'मध्ये विस्डम ट्री ओलांडून पुढे गेलं की सर्वात पहिल्यांदा लागतं ते चंद्रशेखर जोशी सरांचं सदैव उघडं ऑफिस आणि तिथे कधीही जा... आपल्याला नेहमीच कामात व्यग्र असणारे आणि तरीही हसतमुखानं स्वागत करणारे जोशी सर भेटतात. आता 'एफटीआयआय' मधलं शिक्षण पूर्ण होऊन इतकी वर्ष झाली तरीही या खोलीवरून जाताना त्यांची आठवण हमखास येतेच. तर सर्वप्रथम जोशी सरांनी त्यांचे इन्स्टिट्यूटमधील अनुभव मांडणार लेखन केलं आणि ते पुस्तकस्वरुपात प्रकाशित होत आहे याबद्दल त्यांच मनःपूर्वक अभिनंदन. या निमित्ताने कितीतरी कलाकार, मित्रमंडळी, शिक्षक यांच्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या आणि आमचा इन्स्टिट्यूटचा काळ पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहिला. सरकारी संस्थेत काम करणं ही मुळातच खूप जिकिरीची बाब आहे पण आपलं काम जेव्हा आपण आस्थेने करायला लागतो, त्यात मनानं गुंतत जातो आणि त्यात आपल्याला आनंद आणि सार्थकता मिळायला लागते तेव्हा ते काम न राहता आपल्या जगण्याचा एक मार्ग बनतो, हे मी जोशी सरांच्या बाबतीत पाहिलं आहे. त्यामुळेच तर त्यांनी नवनवीन आव्हानं झेलत स्वतःला सतत घडवत ठेवलं. हा घडण्याचा प्रवास त्यांनी इथे प्रामाणिकपणे मांडला आहे. अशा पद्धतीचं लिखाण होणं ही 'एफटीआयआय'साठी महत्त्वाची आणि सकारात्मक गोष्ट आहे. सरांना त्यांच्या पुढील प्रकल्पांकरिता खूप शुभेच्छा !
लेखक. डॉ. चंद्रशेखर जोशी
प्रकाशक. चपराक प्रकाशन
