Skip to product information
1 of 2

akshardhara

Sahitya Nakshatre ( साहित्य नक्षत्रे )

Sahitya Nakshatre ( साहित्य नक्षत्रे )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Medha Sidhaye

Publisher: Gamabhana Prakashan

Pages: 152

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

समीक्षेच्या अंगाने जाणारा डोळस रसास्वाद हे डॉ. मेधा सिधये ह्यांच्या लेखसंग्रहाचे वर्णन यथायोग्य आहे. १९-२० व्या शतकातील नामवंत मराठी साहित्यिकांचा, माहितीपूर्ण आणि समीक्षेची वैचारिक शिस्त पाळून घडवलेला हा आस्वादक परिचय. शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षकांबरोबरच सर्वसामान्य वाचकांनाही किती जिव्हाळ्याचा वाटला त्याची साक्ष म्हणजे साहित्य नक्षत्रे.

कथा, कादंबरी, काव्य, नाटक, वैचारिक वाड्मय अशी मराठी साहित्याची समृध्दी दर्शवणार्या एकूण सत्तावीस लेखक लेखिकांच्या साहित्यसेवेचा परामर्श इथे घेतला आहे. साहित्य वैभव ह्या दिनदर्शिकांसह येणार्या लेखांच्या १००० शब्दांच्या मर्यादेत असा आढावा घेणे ही सोपी गोष्ट नाही. एकूण २७ लेखकात ७ स्त्रिया. १९ व्या शतकाच्या मानाने २० व्या शतकात त्यांच्या संख्या गुणात्मक सहभाग लक्ष वेधतो. काव्येतिहासातील महत्त्वाचे कवी केशवसुत, बालकवी आणि विंदा करंदीकर; अनुक्रमे अर्वाचीन काव्याचे जनकत्व, निर्भरशीलता आणि आधुनिकत्व हे वाचकांच्या मनावर ठसवतात; कोल्हटकर, अत्रे आणि गंगाधर गाडगीळ हे मराठी विनोद परंपरेतील वैविध्य तर खाडिलकर, गडकरी आणि तेंडुलकर हे मराठी नाटकाचा पैस दर्शवतात. अशा प्रकारच्या लेखसंग्रहात समावेशकतेपेक्षा ऒझरते पण माहितीपूर्ण आणि अधिक जाणण्याची उत्सुकता वाढवणारे संस्मरणीय दर्शन महत्त्वाचे. तेच त्याचे यश !

Author :Medha Sidhaye
Publisher :Gamabhana Prakashan
Binding :paperback
Pages :152
Language :Marathi
Edition :2022
View full details