Akshardhara Book Gallery
Gandhiwad Aani Aadhunik Marathi Sahitya (गांधीवाद आणि आधुनिक मराठी साहित्य)
Gandhiwad Aani Aadhunik Marathi Sahitya (गांधीवाद आणि आधुनिक मराठी साहित्य)
Couldn't load pickup availability
Author: Dr Dattatreya Punde
Share
Publisher: Mihana Publications
Pages: 234
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
गांधीवाद आणि आधुनिक मराठी साहित्य
कोणताही 'वाद' (ism) वा तत्त्वप्रणाली म्हणजे विशिष्ट मूल्यात्मक दृष्टीने एकंदर जीवनाकडे पाहण्याची एक भूमिका. मला आणि त्याचे सभोवतालच्या मानुष ते विमानुष जीवनाशी, अखिल विश्वरहस्याशी असणारे नाते लक्षात घेऊन हे 'वाद' मानवी समाजांसाठी विचारव्यूह आणि आचारव्यूह सुचवीत असतात. त्यामुळेच हे निरनिराळे 'वाद' जीवनाच्या सर्व अंगांशी या ना त्या पद्धतीने संबंधित होतात. साहित्य हे मानवी जीवन व्यवहाराचे एक प्रगल्भ व संवेदनशील अंग असल्याने त्याचाही अशा 'वादां 'शी अनुबंध असतो. 'गांधीवाद' हा आधुनिक भारतीय जीवनातील एक महत्त्वाचा 'वाद' होय. भारतीय जीवनपरंपरा व येथील प्राप्त परिस्थिती ध्यानात घेऊन एका महात्म्याने संकल्पिलेलाहा वाद केवळ विचारात्मक पातळीवर न राहता आधुनिक भारतीय जीवनाचा एक आचारशील व्यूहही ठरला. महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांनी महात्मा गांधींचे अनुयायित्व पत्करले; तरीही महाराष्ट्र-मानस व गांधीवाद यामध्ये एक अंतरच राहिलेले दिसते. महाराष्ट्राच्या गांधीवादाशी असलेल्या अन् नसलेल्या अनुबंधाची सखोल मीमांसा करणारा एक प्रयत्न प्रा. गो. म. कुलकर्णी यांनी "गांधीवाद आणि आधुनिक मराठी साहित्य" या सुदीर्घ लेखात केलेला आहे. त्यांचा हा लेख आणि विविध क्षेत्रांतील नामवंत विचारवंतांच्या अभ्यासकांच्या त्यावरील प्रतिक्रिया या ग्रंथात समाविष्ट आहेत. महात्मा गांधींच्या १५७ व्या जयंतीवर्षात प्रकाशित होणारा प्रस्तुत ग्रंथ हा मराठी साहित्यविचाराला निश्चितपणे नवे परिमाण देणारा ठरावा.
संपादक. डॉ. दत्तात्रेय पुंडे
प्रकाशक. मिहाना पब्लिकेशन्स
