Akshardhara Book Gallery
Gard Sabhovati (गर्द सभोवती)
Gard Sabhovati (गर्द सभोवती)
Couldn't load pickup availability
Author: Aashalata Vabgaonkar
Share
Publisher: Lotus India Publication
Pages: 291
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
गर्द सभोवती
'गर्द सभोवती रानसाजणी तू तर चाफेकळी' बालकवींनी लिहिलेलं आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेलं गीत आशालता वाबगावकर या गायिका-अभिनेत्रीने अजरामर केलं. मराठी जनमानसाने काही गाणी आपल्या हृदयाच्या खोल कप्प्यात जतन करून ठेवली आहेत, त्यातलं 'गर्द सभोवती...' हे एक. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे संगीताचे धडे गिरवताना, आशालताबाईंना गळ्यातून उतरविण्यापूर्वी प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्यामागील भाव टिपण्याची सवय लागली. तर राज्य नाट्यस्पर्धेत 'संशयकल्लोळ' नाटकातील नायिका रेवतीची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्री गायिकेला, गोपीनाथ सावकार यांच्यासारख्या सिद्धहस्त दिग्दर्शकाने, अभिनयासाठी निरीक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. मानसशास्त्रात एम.ए. करणाऱ्या आशालताबाईंना आपल्या कारकिर्दीत या निरीक्षणाचा फार मोठा लाभ झाला. आपल्या ललितलेखनातही आशालताबाईंनी या निरीक्षणाचा प्रभावीरित्या वापर केल्याचं दिसत आहे. ललितलेखांच्या या संग्रहासाठी आशालताबाईंचं मनःपूर्वक अभिनंदन ! पुढे येणाऱ्या त्यांच्या पुस्तकांचा आरंभ 'गर्द सभोवती...' ने होवो आणि ह्या गाण्याबरोबर आशालताबाईंची कारकीर्द जशी बहरत गेली, तशीच 'लेखिका' म्हणूनही त्यांची कारकीर्द बहरत जावो, ह्या शुभेच्छा !
लेखक. आशालता वाबगावकर
प्रकाशक. लोटस पब्लिकेशन
