Akshardhara Book Gallery
Gatha Swarajyachi Pailu Shivacharitrache (गाथा स्वराज्याची पैलू शिवचरित्राचे)
Gatha Swarajyachi Pailu Shivacharitrache (गाथा स्वराज्याची पैलू शिवचरित्राचे)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sadanand Kadam
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 276
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
गाथा स्वराज्याची पैलू शिवचरित्राचे
शिवछत्रपतींचे आयुष्य म्हणजे चमत्कार खरा. पण तो दैवी चमत्कार नव्हे. त्यामागे होता शिवरायांचा पराक्रमी पुरुषार्थ. बुद्धी, विचार, धाडस, हिंमत, संवेदनशीलता, मुत्सद्देगिरी, द्रष्टेपण अशा अनेक गुणांच्या समुच्चयातून शिवराय नावाचे हे उत्तुंग शिल्प घडलेले आहे. ते समजून घ्यायचे असेल, तर आपणास आपली दृष्टी विस्तारावी लागेल. दशदिशांनी हे शिखर न्याहाळावे लागेल. सदानंद कदम यांनी 'गाथा स्वराज्याची'मधून हाच प्रयत्न केला आहे. या पुस्तकातून शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वातील या अशा विविध पैलूंचा मोठ्या जाणकारीने वेध घेतलेला आहे. याचे वेगळेपण हे ठरते, की हा केवळ रूक्ष इतिहास नाही. यात रोचकता आहे. यात भावना आहेत. एका शिवप्रेमीने अन्य शिवप्रेमींच्या काळजात शिवप्रेमाची मशाल बुद्धिपूर्वक तेजाळत राहावी यासाठी कळकळीने मांडलेला हा अभ्यासपूर्ण प्रपंच आहे. विकृत इतिहासाच्या ध्वजदंडावर अस्मितांच्या पताका उभारण्याचा हा काळ. अशा काळात शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारे हे पुस्तक अत्यावश्यक होते. - रवि आमले
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

