Akshardhara Book Gallery
Gau Majet Gane (गाऊ मजेत गाणे)
Gau Majet Gane (गाऊ मजेत गाणे)
Couldn't load pickup availability
Author: Balaji Bhaganagare
Share
Publisher: Mihana Publications
Pages: 64
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Gau Majet Gane (गाऊ मजेत गाणे)
मुलांसाठी लिहिताना मुलांचं अवखळ मन आपल्याला आधी वाचता आलं पाहिजे. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असणारे बालाजी भागानगरे हे मुलांचे अवखळ मन वाचतात, मुलांना काय हवे काय नको ते जाणतात आणि मुलांच्या भाषेत कवितेतून ते व्यक्तही होतात. 'बाला गं बाला' या बालकवितासंग्रहातून ते बालकांच्या भेटीला याआधी आलेच आहेत. आता ते 'गाऊ मजेत गाणे' हा नवीन बालकवितासंग्रह मुलांसाठी घेऊन आले आहेत. हा बालकवितासंग्रह केवळ मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडेल; त्यांच्या वाचनानंदात भर घालेल असाच आहे.
निसर्ग, नातेसंबंध, पक्षी, प्राणी, आजूबाजूचा परिसर, सण, उत्सव यांसारख्या विविध विषयांवरील या कविता मुलांचे मनोरंजन तर करतातच शिवाय अनेक नवीन गोष्टींची मुलांना सहजगत्या ओळखही करून देतात.
लेखक: बालाजी भागानगरे
