Akshardhara Book Gallery
Gavajhula (गावझुला)
Gavajhula (गावझुला)
Share
Couldn't load pickup availability
Author: Shyam Pethkar
Publisher: Vijay Prakashan
Pages: 293
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
गावझुला
पावले
ही पावले कुठे बरे जातात ?
मला याचा शोध घेऊ दे !
कुठेही पाहिले तरी मला पावलेच दिसतात
आकाशाच्या निळ्या मुलायम रेतीतसुद्धा
पावलांचे ठसे उमटलेले मी पाहतो.
अगदी दूरवर, जेथवर दृष्टी जाते तेथवर
ती त्यांचा पाठलाग करते.
येथील या हवेत, वातावरणात,
तुमच्या-माझ्या बोलण्यात, हसण्या - रडण्यात
पावलांचे ठसे उमटलले मला दिसतात.
काही पावलांचे ठसे तर माझ्या हृदयात
मी जतन करून ठेवले आहेत.
त्यांची मी पूजा करतो.
म्हणतो, "कोणत्या वाटांनी तुम्ही गेलात
सांगा ना मला ! तुमच्या दुःखांचा अंश
माझ्याही वाट्याला आलेला आहे.
परंतु मला साऱ्या वाटा बंद का ?"
आवाज येतो, "चल तूही चल पावलांबरोबर." __म. म. देशपांडे
लेखक : श्याम पेठकर
प्रकाशक : विजय प्रकाशन
