Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Gaza-Israel Sangharsha (गाझा इस्रायल संघर्ष)

Gaza-Israel Sangharsha (गाझा इस्रायल संघर्ष)

Regular price Rs.306.00
Regular price Rs.340.00 Sale price Rs.306.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Nilu Damle

Publisher: Rohan Prakashan

Pages: 216

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Gaza-Israel Sangharsha (गाझा इस्रायल संघर्ष)

इस्रायल कधी नव्हे तो बेसावध राहिला....
आणि ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने त्याच्यावर जोरदार आणि चौफेर हल्ला केला..
त्या हल्ल्याचा प्रतिशोध घेता-घेता इस्रायलने गाझावर बेबंदपणे अविरत बॉम्ब हल्ले केले. घरं, दारं, माणसं, शिक्षण संस्था, हॉस्पिटल्स, रीलीफ कॅम्प्स, अॅम्ब्युलन्स काहीच सोडलं नाही. गाझा जवळपास उद्ध्वस्त झालं... हा झाला वर्तमान. पण पॅलेस्टाइनचा या वादग्रस्त तिढ्याला इतिहास आहे तो अनेक शतकांपासूनचा.
विशेषतः १९४८ साली इस्रायलची स्थापना झाली आणि या वादग्रस्त समस्येच्या कक्षा अनेक पटींनी रुंदावल्या. पॅलेस्टाइनचं म्हणणं असं की, ही भूमी आमची.... तर, इस्रायल स्वप्न पाहतो आहे,
ते संपूर्ण पॅलेस्टाइन भूमी काबीज करण्याचं.
इतिहास काय सांगतो? वास्तव स्थिती काय सांगते? सुप्रसिद्ध पत्रकार-लेखक निळू दामले मुळात जाऊन
या प्रकरणाचा उलगडा करतात.
आणि सद्य घटनांचे तपशीलही सांगतात.
अतिशय गुंतागुंतीचा तिढा सहज, सोप्या शैलीत सांगणारं पुस्तक... 

लेखक: निळू दामले 

View full details