Akshardhara Book Gallery
Genome To Om (जिनोम ते ॐ)
Genome To Om (जिनोम ते ॐ)
Share
Couldn't load pickup availability
Author: Bhushan Patwardhan , Indu Ramchandani
Publisher: Sakal Prakashan
Pages: 429
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Genome To Om (जिनोम ते ॐ)
मानवतेचं उलगडणारं भवितव्य
आपलं मूळ, आपली उत्पत्ती, आपली ओळख, आपली उद्दिष्ट, उत्क्रांतीतून सतत बदलत जाणारं मानवतेचं भविष्य, अशा आयुष्यातील प्रचंड गूढ वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जर इथंच मिळाली तर? 'जिनोम ते ॐ' हा असा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रवास आहे, जो विश्वाच्या उत्पत्तीचा संबंध, स्वयम आणि अंतिम सत्य, यांच्याशी लावतो. हे प्रेरणादायी पुस्तक, आधुनिक विज्ञानाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जनुकांचं विस्मयकारी जग आणि 'ॐ' चा नाद, यांत खोल झिरपतं. जीवनाच्या आध्यात्मिक साराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वैश्विक 'हम्म' या नादाचा शोध, हे त्याचंच प्रतिबिंब आहे. हे पुस्तक वाचकाला, मृत्युच्या सीमांच्या पलीकडे नेतं. जनुकं, पर्यावरण, चेतना यांच्यातील नाजूक परस्परसंबंधांचा ते शोध घेतं. कृत्रिम बुद्धिमत्तेची आणि जनुकीय अभियांत्रिकीची नैतिक आव्हाने, मानवी मन आणि चित्त यांची रहस्य उलगडणं, केवळ विचार करण्यापेक्षा अधिक खोलात जाऊन, अंतर्ज्ञान प्राप्त करणं, हे आधुनिक पेच 'जिनोम ते ॐ' व्यक्त करतं. हे पुस्तक, एका अशा परिवर्तनकारी काळाला, ज्यात, विज्ञान आणि आध्यात्मिकतेच्या आशादायी संयोगाने, एक सुसंवादी आणि संतुलित विश्व निर्माण होऊ शकतं आणि एका अस्थिर मानवकेंद्रित युगाकडून, सर्वसमावेशक मानववंशाकडे जाता येऊ शकतं, अर्थात 'ओमयुगा'ला प्रत्यक्षात आणण्याचं आमंत्रण देतं. व्यावहारिक, कुतूहलवर्धक आणि अत्यंत समयोचित असा हा आलेख, आपल्याला ज्ञात व अज्ञात जग जाणून घेण्याचं, सतत बदलणाऱ्या जगात आपल्या उद्दिष्टांचा पुनर्विचार करण्याचं आवाहन करतो. 'जिनोम ते ॐ', हे केवळ वाचनीयच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन, मानवतेच्या भविष्याकडे, ऐक्य, शांती आणि वैश्विक कल्याण साधण्याकडे नेणारं लिखाण आहे.
लेखक: भूषण पटवर्धन, इंदू रामचंदानी
अनुवादक: डॉ. जया कुऱ्हेकर
