Akshardhara Book Gallery
George Orwell : Nivadak Nibandh Ani Lekh ( जॉर्ज ऑर्वेल : निवडक निबंध आणि लेख )
George Orwell : Nivadak Nibandh Ani Lekh ( जॉर्ज ऑर्वेल : निवडक निबंध आणि लेख )
Share
Couldn't load pickup availability
Author: Manoj Patharkar
Publisher:
Pages: 263
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
जॉर्ज ऑर्वेल : निवडक निबंध आणि लेख
ऑर्वेलचे निवडक निबंध आणि लेख ऑर्वेलचे निबंध महत्त्वाचे यासाठी की, त्याच्या मनातील विचारप्रक्रिया त्यात स्पष्ट दिसतात. हे निबंध आपल्याला महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल प्रचारकी दृष्टिकोन टाळून चिकित्सक विचार करण्यासाठी उद्युक्त करतात. या लेखनात अनुभवास येणारा ‘आपुलाचि वाद आपणांसी’ ही लोकशाही जीवनपद्धतीची पहिली पायरी आहे, हे लक्षात घ्यायला हवे. इतरांना प्रश्न विचारण्यापूर्वी प्रथम स्वत:च्या मनात जपून ठेवलेल्या पूर्वग्रहांना, प्रचारकी अडगळीला प्रश्न विचारता यायला हवेत. यात ऑर्वेलचे दैवतीकरण करण्याचा अजिबात हेतू नाही. तसे करणे त्याच्या विचारांचा आणि लेखनशैलीचा पराभव असेल. ऑर्वेलचे आयुष्य आणि भूमिका यांबद्दलचे काही प्रश्न अनुत्तरीत आहेत आणि बहुधा ते तसेच राहतील. मात्र त्याने मागे ठेवलेले लेखन आपल्याला आपली मते जबाबदारीने शोधण्यासाठी साहाय्यक ठरेल, हे निश्चित.
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन