Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

GLADIOLAS (ग्लॅडिओलस)

GLADIOLAS (ग्लॅडिओलस)

Regular price Rs.75.00
Regular price Rs.75.00 Sale price Rs.75.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Arun Nafde

Publisher: Continental Prakashan

Pages: 79

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

GLADIOLAS (ग्लॅडिओलस)

(जन्म : १५-७-१९४०, नागपूर)
यांनी नागपूर विद्यापीठातून एम.एस्सी. (कृषी- उद्यानविद्या) आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर येथून डॉक्टर ऑफ फिलॉसफी (पी.एच.डी.) ही पदवी (फलोद्यान) संपादन केली. १९६४ सालापासून ते महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असून त्यांची प्रभारी अधिकारी, माळी प्रशिक्षण केंद्र, नागपूर, संत्रा संशोधन केंद्र, काटोल (नागपूर) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई द्वारा १९६९ मध्ये सहाय्यक फलोद्यान विकास अधिकारी, पुणे विभाग, पुणे येथे निवड झाली. एप्रिल १९७४ पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरीअंतर्गतअसलेल्या शेतीशाळांचे अधिक्षक, उद्यानविद्यावेत्ता, केळी संशोधन केंद्र, यावल,
जि. जळगाव, १९८३ पासून कृषि महाविद्यालय धुळे, कोल्हापूर, पुणे येथील उद्यान विद्या विभागाचे प्राध्यापक व प्रमुख तसेच सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील उद्यान विभागाचे प्राध्यापक व प्रमुख अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. संशोधन, शिक्षण, विस्तार कार्य आणि रोपवाटिका निर्मिती या क्षेत्रात दीर्घ अनुभव आहे. पन्नासचेवर संशोधनात्मक लेख निरनिराळ्या मासिकांमध्ये प्रसिद्ध असून दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्रावर उद्यान पिकांवर भाषणे केली. सन १९९९ मध्ये विद्यापीठ सेवेतून निवृत्त. मराठीतील कृषी विषयक मासिके, सकाळ दैनिक वृत्तपत्र 'तसेच 'ॲग्रोवन' दैनिक वृत्तपत्रामध्ये सातत्याने नियमित लेखन चालू आहे. 'हरितगृह', 'व्यावसायिक भाजीपाला उत्पादन', 'फुलशेतीचे उच्चतंत्रज्ञान', 'व्यावसायिक फलोत्पादन', 'गुलाब लागवड', 'परदेशी भाजीपाला लागवडीचे उच्चतंत्रज्ञान', ही मराठी भाषेत तर 'एक्झॉटिक व्हेजिटेबल्स' हे पुस्तक इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेले हे आहे. हरितगृह तंत्रज्ञानाबाबत, भाजीपाला, फुले, फळे परदेशी भाजीपाला आणि रोपवाटिका निर्मिती यांच्या व्यापारी तत्त्वावर लागवडीबाबत त्यांच्याकडे विशेष ज्ञान व दीर्घ अनुभव असून या बाबतचा तांत्रिक सल्ला देण्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हरितगृहांमध्ये व लागवडीचे क्षेत्रावर भेटी देतात.

लेखक: डॉ. अरुण नाफडे 

View full details