Akshardhara Book Gallery
Goin (गोईण)
Goin (गोईण)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Rani Bang
Publisher: Granthali
Pages: 211
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
गोईण
गोईण म्हणजे मैत्रीण.
एका शिबिरात 'समुदरसोक' (किंवा 'बेशरम') या झाडाविषयी चर्चा सुरु असताना एक सुईण अचानक बोलून गेली, " बाई, या झाडाचा उपयोग नवर्याला मारण्यासाठी करता येतो." हे ऐकून मला धक्काच बसला. कारण 'नवर्याला मारण्यासाठी झाडाचा उपयोग' हे मी पहिल्यांदाच ऐकत होते! मी विचारलं,"नवर्याला का मारायचं?" तर ताबडतोब काही सुईणी म्हणाल्या, "बाई, तो आपल्याला त्रास देत असला, दुसर्या बाईसोबत लफूटपणा करत असला किंवा आपले दुसर्या पुरुषासोबत संबंध असले तर नवऱ्याला नाही मारायचं का बाई? "
गडचिरोली हा जंगलांचा जिल्हा ! इथली जवळजवळ साठ टक्के जमीन जंगलाखाली आहे आणि जिल्ह्याच्या लोकसंख्येत पन्नास टक्के आदिवासी आहेत. गडचिरोली गावापासून सात-आठ किलोमीटर दूर गेल्यावर जंगल दिसायला लागते. सुरुवातीला झुडपी जंगल, पण आत-आत गेले की जंगल दाट होत जाते आणि झाडांची उंची पण वाढते.
येथील आदिवासींशी गप्पागोष्टी करण्यामधून इथले जंगल, इथली झाडे, त्यांचे विविध उपयोग-खाण्याचे पदार्थ, औषधी, सरपण, कुंपण वैगरेबाबत कितीतरी उपयुक्त आणि मनोरंजक माहिती मिळते जाते. तीच या पुस्तकात समाविष्ट केली आहे. - डॉ. राणी बंग
Author. Dr. Rani Bang
Publication. Granthali
