Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Goshta Eka Parisachi ( गोष्ट एका परिसाची )

Goshta Eka Parisachi ( गोष्ट एका परिसाची )

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Ravi Salvi

Publisher: Palvi Prakshan

Pages: 96

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

 गोष्ट एका परिसाची 

ग डदुर्गेश्वर रायगडाच्या सान्निध्यात आणि प्रेरणादायी महाडच्या पवित्र भूमीत जन्मलेले रवींद्र रामचंद्र साळवी हे संवेदनशील कवी, लेखक आणि रंगकर्मी म्हणून ओळखले जातात. महाडमध्येच शिक्षण घेत असताना साहित्य आणि रंगभूमीची ओढ निर्माण झाली आणि ती पुढे 'After the Blast' या व्यावसायिक नाटकापर्यंत पोहोचली. त्यांनी मानसशास्त्र व इतिहास विषयांसह बी.ए. पूर्ण करून वेलिंगकर, मुंबई येथून मटेरियल मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. मागील १६ वर्षांपासून Sandoz आणि Olon India या बहुराष्ट्रीय कंपन्यांत कार्यरत राहून त्यांनी शिस्तबद्ध, जबाबदार आणि यशस्वी व्यावसायिक ओळख निर्माण केली आहे. तरीही कलेशी असलेली नाळ त्यांनी कायम जपली. अभिनय आणि कवितेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र छाप निर्माण केली असून त्यांच्या कवितांना काव्यसंमेलनांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

 'पाऊलखुणा' हा काव्यसंग्रह आणि 'गोष्ट एका परिसाची' ही चरित्रात्मक कादंबरी त्यांच्या सृजनशीलतेची साक्ष देतात. कविवर्य मंगेश पाडगांवकर आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या सहवासातून त्यांच्या लेखनाला प्रेरणेची समृद्ध दिशा मिळाली.

रवि साळवी हे केवळ लेखक नाहीत, तर भावना आणि विचार यांना अर्थ देणारे व्यक्तिमत्त्व आहेत. संवेदनशीलता, सकारात्मक दृष्टिकोन, सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि सामाजिक जाणीव यांच्या संगमातून त्यांचे लेखन आकार घेते. त्यांच्या शब्दांत भावना जिवंत होतात, विचार अधिक सखोल होतात आणि वाचकांच्या मनात एक दीर्घकाळ टिकणारी छाप उमटते.

लेखक : रवि साळवी 
प्रकाशन : पालवी प्रकाशन 

View full details