Skip to product information
1 of 2

akshardhara

Prajaktaprabha (प्राजक्तप्रभा)

Prajaktaprabha (प्राजक्तप्रभा)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Prajakta Mali

Publisher: Granthali

Pages: 35

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

मी कवयित्री नाही होण्याचा मानस-मोहही नाही अगाध वाचन, जिभेवर नाचती सरस्वती मनात शांताबाई, ग्रेस, कुसुमाग्रज अशी काही माझी गत नाही मी कवयित्री नाही... माझ्या आधी कैक मंडळी अनंत विचार देऊनी गेली माझ्यानंतर कैक येतील अपार म्हणणं मांडुनी जातील काही सांगू पाहणाऱ्यांच्या मांदियाळीतलं मी पहिलं, शेवटचं अथवा सुवर्णपान नाही मी कवयित्री नाही... काही अतीव दुःखाच्या, आनंदाच्या, प्रेमाच्या, त्राग्याच्या, अपमानाच्या, रागाच्या, समर्पणाच्या एकाकीपणाच्या क्षणांमध्ये जे सुचलं, स्फुरलं, तरळलं, कळलं, समजलं, झिरपलं ते कवितारूपानं प्रकटलं, सामोरी आलं सगळ्यांना ते आवडलंच पाहिजे असा माझा अट्टहास नाही मी कवयित्री नाही... ह्यातल्या निदान एका विचारानं पुढल्या पिढ्यांपैकी निदान एकाच्या जाणिवेच्या कक्षा रुंदावल्या, फोफावल्या तरी माझा आत्मा वर गती पावील... याहून मोठा आनंद-समाधान नाही जरी... मी कवयित्री नाही!

ISBN No. :GRA0226
Binding :Paperback
Pages :35
Language :Marathi
Edition :2021
View full details