akshardhara
Vivahsanstha Sankalpana Ani Sankraman ( विवाहसंस्था संकल्पना आणि संक्रमण )
Vivahsanstha Sankalpana Ani Sankraman ( विवाहसंस्था संकल्पना आणि संक्रमण )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कृतयुगी ही केवळ कळपातील मादी होती. पोटाची नाती असूनही ती नात्यातील होती. त्रेतायुगात ही बंधनी झाली, पुरुषाच्या परवानगीने भोग घेऊ लागली. द्वापारयुगात ती मैथुन धर्मी अधर्मी झाली. कलियुगात ती एक विवाहसंस्था झाली. पाळण्यातच ती उजवली गेली, विधवा होताच विद्रूप केली गेली, संस्थेची गुलाम, नवर्याची दासी, घरादाराची मोलकरीण झाली ! समाजमन जागे होताच ती माजघरात आली. माजघरातून अंगणात आली आणि अंगणातून तिला आभाळ च मोकळे मिळाले. आज ती उंचच उंच भरार्या घेत असली तरी विवाह संस्थेच्या पायात तिचा पाय अडकून पडलाय. ती मुक्त आहे नि प्रेमाने रिक्त आहे. तिला हवाय सहचरी, सखा, मित्र ! तिला हवा श्वास निश्वासाचा विश्वास ! तिला हवा प्रेमाचा, वात्सल्याचा, जिव्हाळ्याचा, कळवळ्याचा, आपुलकीचा प्रतिसाद !
Author | :Anuradha Nerurakar |
Publisher | :Granthali |
Binding | :Paperback |
Pages | :167 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |