Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Haikurutu (हायकूऋतू)

Haikurutu (हायकूऋतू)

Regular price Rs.252.00
Regular price Rs.280.00 Sale price Rs.252.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vijay Padalkar

Publisher: Yaksh Prakashan

Pages: 104

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

हायकूऋतू

विजय पाडळकरांचा हा हायकूऋतू त्यांच्या सहाही ऋतूंत पुरता विरघळला आहे. जो वाचकांना आनंद देतो. वैयक्तिकदृष्ट्या त्यांचे हायकू मला माझ्या त्रिपर्दीचे समानधर्मा वाटतात आणि अधिकच आनंद देतात. अभिजात जपानी हायकूंत ते मुरलेले आहेत. म्हणूनच त्यांच्या हायकूंत गोगलगायी ऊन खायला निघतात, बेडूक आनंदाने कारंजाखाली न्हातो. घंटा वाजल्यावर फुलपाखरू उडून जाते ! पाडळकरांची निरीक्षणे मार्मिक आहेत. त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावीशी वाटते. त्यांच्या हायकूत तत्वज्ञान अनुस्यूत असते. वेगळी सांगितली नाही तरी त्यांची नैतिक भूमिका वाचकापर्यंत पोहोचते. पाडळकर हायकूची बैठक सोडीत नाहीत, तरी त्यांच्या हायकूत पाने फुले. पशुपक्षी यांच्याबरोबर मनुष्यप्राणीही कधीतरी डोकावतो. आपल्या गतीने यापुढेही ते हायकुंचा शोध घेत राहतील आणि त्यांचे हायकू आपल्याला आनंद देत राहतील. पाडळकरांनी या हायकूऋतूचा समारोप करताना अंतिम क्षणी मनात थोडेसे रंग उरावेत एवढीच मागणी केली आहे. माझी मागणी एवढीच आहेः त्यांच्या हायकूंना तिसरी ओळच न सापडो.

लेखक. विजय पाडळकर 
प्रकाशक. यक्ष प्रकाशन 

View full details