Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Haravlelya Karnphulanche Rahasy (हरवलेल्या कर्णफुलांचे रहस्य)

Haravlelya Karnphulanche Rahasy (हरवलेल्या कर्णफुलांचे रहस्य)

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sudha Murty

Publisher: Mehta Publishing House

Pages: 143

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Leena Sohoni

हरवलेल्या कर्णफुलांचे रहस्य

एक अँटिक रत्नजडित कर्णफुलांची जोडी केवळ अपघातानेच अनुष्काच्या हाती लागते आणि आजी-आजोबांसोबत सुटी घालवण्यासाठी उत्तर भारताच्या सहलीला निघालेल्या अनुष्काचा तो प्रवास पुन्हा एका नव्या साहससफरीत बदलून जातो. उज्जैनच्या पवित्र घाटांपासून ते अमृतसरच्या गजबजलेल्या रस्त्यांपर्यंत आणि त्यानंतर विविध ऐतिहासिक घटनांच्या आणि रोमांचकारी कथांची साक्षीदार असलेल्या दिल्ली शहरातील गल्लीबोळांमधून पुढे निघून अनुष्काची ती सफर थेट लंडनला जाऊन पोचते. इतिहासाच्या रहस्यमय आणि गूढरम्य रंगात चमकणाऱ्या धाग्यांचा माग काढत अनुष्का पुढे जाते. या सफरीच्या प्रत्येक टप्प्यावर तिला विरहाच्या आणि प्रेमाच्या भूतकाळात हरवून गेलेल्या कहाण्या भेटतात, आणि तिला जाणवतं, की खरे अलंकार केवळ सुंदर नसतात त्यांच्यात जतन करून ठेवण्यासारख्या आठवणी दडलेल्या असतात. भारतातील आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय असलेल्या कथालेखिका सुधा मूर्ती यांनी आपल्या अनोख्या शैलीत कथन केलेली 'हरवलेल्या कर्णफुलांचे रहस्य' ही एक मैत्रीच्या ओलाव्याने आणि आपुलकीने भरलेली एकोप्याची, धैर्याची आणि वारश्याची कहाणी आहे आणि ती शेवटच्या पानापर्यंत वाचकाला गुंतवून ठेवेल आणि वाचून संपल्यावरसुद्धा वाचकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहील यात शंकाच नाही.

लेखक. सुद्धा मूर्ती 
अनुवादित लेखक. लीना सोहोनी 
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details