Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Hasta Chinha Shastra (हस्त चिन्ह शास्त्र)

Hasta Chinha Shastra (हस्त चिन्ह शास्त्र)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Kedar Goswami

Publisher: Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha

Pages: 94

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

हस्त चिन्ह शास्त्र 

सुबोध भृगुसंहिता खंड १ ते ७

 (मूळ संस्कृत ग्रंथाचे स्वैर, विस्तृत मराठी रुपांतर)

खंड १,२ व ३ * स्त्री-पुरुष फलीत व सर्वारिष्ट निवारण खंड

 पृष्ठे ८६८ या अद्वितीय ग्रंथाच्या आधारे प्रत्येकाचे भविष्य पाहाता येते. प्रत्येक व्यक्तीचे स्वभाववर्णन, जीवनातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटना कालमानानुसार दिलेल्या आहेत. अशुभकाल त्रासाचे उच्चाटन करण्यासाठी अनेक दैवी उपाय, जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटणाऱ्या प्रत्येकाने वाचावा असा अपूर्व ग्रंथराज ! या खंडात फक्त भविष्य दिलेले आहे. कुंडली खंडातून कुंडली पाहून त्यानुसार यात भविष्य पाहाणे आवश्यक असते. संकटे दूर करणारे 'सर्वारिष्टनिवारण स्तोत्र' हे अत्यंत प्रभावी व मंत्रसिद्ध स्तोत्र यात दिलेले आहे.

खंड ४ * कुंडली खंड भाग १ व भाग २ पृष्ठे ४३४+ १२०

या खंडात इसवी १९०१ ते २०२५ या काळात जन्माला आलेल्या आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कुंडली दिलेली आहे. कुंडल्या वर्षावर्षानुसार दिलेल्या आहेत. यातील आपली कुंडली शोधून काढून त्यानुसार आपले भविष्य 'स्त्री-पुरुष फलित' या खंडात पाहावे लागते. या खंडात फक्त कुंडल्या दिलेल्या आहेत.

खंड ५ व ६ * राज खंड व संतान उपाय खंड पृष्ठे २७२

 या ग्रंथात दोन्ही विभागात केवळ जन्मवेळ आणि जन्मतिथी यांवरून भविष्य दिलेले आहे. जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटना, आयुष्याची रुपरेषा इत्यादी माहिती. दुसऱ्या विभागात संतती प्राप्तीच्या बाबतीतील सर्व अडचर्णीचे उच्चाटन करण्याचे दैवी उपाय उपाय दिलेले आहेत. इच्छित संतती प्राप्तीसाठी अत्यंत दिव्य ग्रंथ.

खंड ७ * जातक खंड पृष्ठे ५४४

 ज्योतिषशास्त्राचे अल्पज्ञान असलेल्यांना, त्याचप्रमाणे या शास्त्राचा सखोल अभ्यास करणाऱ्यांना अत्यंत उपयुक्त असा अद्वितीय ग्रंथ. या ग्रंथावरून कोणत्याही कालखंडात जन्मलेल्या व्यक्तीच्या भावचलित कुंडलीवरून आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचा भविष्यकालीन अंदाज अचूक घेता येईल, या अद्भुत ग्रंथात प्रत्येक व्यक्तीचे संवत्सरफल, ऋतुफल, मासफल, पक्षफल, तिथीफल, वारफल, नक्षत्रफल, योगफल, करणफल, लग्नफल, प्रत्येक भावाचे फल आणि शेवटी राशीफल दिलेले आहे. या ग्रंथात प्रत्येक प्रकारात प्रत्यक्ष व्यक्तींची विपुल उदाहरणे दिलेली आहेत. त्यावरून आपले भविष्य पडताळून पाहाता येईल.

लेखक : केदार गोस्वामी 
प्रकाशन : केशव भिकाजी ढवळे 

View full details