Akshardhara Book Gallery
Hatya ( हत्या )
Hatya ( हत्या )
Share
Couldn't load pickup availability
Author: S. N. Pendse
Publisher: Majestic Publishing House
Pages: 320
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
हत्या
श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबरीविश्वात 'हत्या' ही कादंबरी विशेषत्त्वाने उठून दिसते; ती तिच्यातील वेगळेपणाने. वास्तवाच्या पातळीवरील, तर्कसंगत आणि हृद्य अशी ही कथा पेंडसे यांनी आपल्या कादंबरीसाठी निवडली आणि पेंडसे यांची कादंबरी खऱ्या अर्थाने जीवनाशी पहिल्यांदा अधिक समरस झाली; परिस्थितीने आबाळलेला, शारीरिक व्यंगामुळे अव्हेरलेला आणि गरिबीने पिचलेला असा हा कुठल्याही अर्थाने तत्कालीन 'नायक' न शोभणारा, पौगंडावस्थेतील मुलगा या कादंबरीचा नायक झाला ही तत्कालीन वाङ्मयाभिरुचीच्या चौकटीत न बसणारी गोष्ट होती. आपल्या वेदनेची आणि परिस्थितीने दिलेल्या चटक्यांची खालच्या सुरात दुःखार्त अशी मांडणी करणारी आणि काळजाला हात घालणारी ही कादंबरी आहे. पेंडसेविश्वातील पुढील कादंबऱ्यांच्या विकासाची बीजे या कादंबरीत सुप्तपणे विखुरलेली दिसतात. 'हत्या'च्या निमित्ताने पेंडसे यांनी मराठी कादंबरीतील 'हिरो'ची प्रतिमा पार बदलवून टाकण्याचे जे धाडस केले, त्यासाठी तरी या कादंबरीचे मोल आपण मान्य करायला हवे. - डॉ. रवींद्र शोभणे
प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
