Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Hi Ishwarachi Daya ! (ही ईश्वराची दया !)

Hi Ishwarachi Daya ! (ही ईश्वराची दया !)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Acharya Atre

Publisher: Parachure Prakashan

Pages: 187

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Hi Ishwarachi Daya ! (ही ईश्वराची दया !)

ईश्वरी दयेला आम्ही सर्वात जास्त महत्त्व देतो. या ठिकाणी ईश्वर आहे किंवा नाही आणि ईश्वरावर तुमचा विश्वास आहे की नाही, हा वाद हास्यास्पद आहे. कारण तो वाद निर्माण करणारे लोक अडाणी असतात. त्यांनी काही वाचलेले नसते किंवा कसलाही विचार केलेला नसतो. ईशावास्योपनिषदाच्या पहिल्याच मंत्रात म्हटले आहे की 'ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्' (जगात जे काही जीवन आहे, ते सर्व ईश्वराने भरलेले आहे!) हे जे विश्व डोळ्यांना दिसते आहे, बुद्धीला समजते आहे नि कल्पनेला भासते आहे त्या सर्व विश्वावर ईश्वराची सत्ता आहे. त्याचप्रमाणे या विश्वातील प्रत्येक वस्तू वा हालचाल ही ईश्वराने भरलेली आहे. सारांश, सारे ईश्वरमय आहे, हे ध्यानी आल्यावाचून या विश्वाचे कोडे उलगडायचे नाही. कोणी विचारील, की कोठे आहे ईशशक्ती ? दाखवा. त्याला अनेक उत्तरे आहेत. प्रत्येक वस्तूत ईशशक्ती तर आहेच आहे. पण काही वस्तूंत ती सूप्त आहे. काहींत प्रकट आहे. चंदनाच्या लाकडातला सुप्त सुगंध ज्याप्रमाणे सहाणेवर घासल्यावाचून प्रकट होत नाही, त्याप्रमाणे वस्तूमधील किंवा व्यक्तीमधील अप्रकट ईशशक्ती चिंतनाच्या सहाणेवर घासल्यावाचून प्रकट होत नाही. तुम्हाला प्रकट झालेल्या ईशशक्तीचा प्रत्यक्ष पुरावाच पाहिजे असेल तर मानवी शरीराकडे पाहा. चर्म, अस्थी, रक्त, श्लेष्मा इत्यादी निर्जीव गोष्टी मिळून हे शरीर झाले आहे. पण शरीराचे हे कातडे बोलते, पाहते, ऐकते, खाते, ही हाडे चालतात-पळतात हे कसे काय होते ? शरीरात काय किल्ली देऊन एखादे यंत्र बसविले आहे का एखादा जादूगार आत दडून बसला आहे? आमच्या लहानपणी शाळेत आम्ही एक कविता शिकलो होतो.
डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानीं, पदीं चालतो; जिव्हेने रस चाखतो मधुरही वाचा मुखे बोलतो; हातांनी बहुसाळ काम करतो, विश्रांतिही घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरून उठतो ही ईश्वराची दया !

लेखक : आचार्य अत्रे 
प्रकाशक : परचुरे प्रकाशन 

View full details